शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गडकरींच्या समोर काँग्रेसचे नाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या देशभरातील २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांची नावे असून यात पटोले व उसेंडी यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीतून नामदेव उसेंडी : दुसऱ्या यादीत नाव निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या देशभरातील २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांची नावे असून यात पटोले व उसेंडी यांचा समावेश आहे.खैरलांजी प्रकरणातील आरोपींना मदत करण्याचा आरोप करीत दलित संघटनांनी पटोले यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल व टष्ट्वीट केले होते. तसेच बाहेरचा उमेदवार म्हणूनही काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध झाला होता. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत पटोले यांचे नाव देण्यात आले. नागपूरसाठी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, डॉ. बबनराव तायवाडे इच्छुक होते. शेवटी पटोले यांनी बाजी मारली.पटोले हे १९९९ ते २०१४ पर्यंत भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार होते. भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा- गोंदियातून ते अपक्ष लढत पराभूत झाले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर त्यांनी उघडपणे टीका केली. भाजप नेत्यांवरही ताशेरे ओढले. यामुळे ते भाजपापासून दुरावले. नाराजीतून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व भाजपालाही रामराम ठोकला. गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारात ते उघडपणे फिरले व नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या भंडारा- गोंदियाच्या पोटविडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना विजयी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.डॉ.नामदेव उसेंडी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना गडचिरोली-चिमूर क्षेत्रासाठी काँग्रेसने उतरविले. त्यांना साडेतीन लाख मते मिळाली. परंतु मोदी लाटेत त्यांना भाजपचे अशोक नेते यांनी सुमारे दीड लाख मतांनी पराभूत केले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी