शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

मुस्लीम समाजावर पकड ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

By admin | Updated: September 26, 2016 02:59 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेता प्रदेश काँग्रेस समितीने आपला परंपरागत मतदार

विभागनिहाय समित्या स्थापन : मुस्लीम नेते, डॉक्टर, वकील, उद्योजकांना भेटणारनागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेता प्रदेश काँग्रेस समितीने आपला परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम समाजावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या मुस्लीम समाजातील विविध स्तरातील लोकांमध्ये जाऊन काँग्रेसचे ध्येय धोरण मांडतील, काँग्रेसने अल्पसंख्यांक विकासासाठी केलेल्या कामाची माहिती देईल व मुस्लीम समाजात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. हे सर्व करताना मुस्लीम समाजाच्या वास्तविक स्थितीचा अभ्यासही केला जाणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अल्पसंख्यांक उपसमितीची बैठक झाली. तीत अल्पसंख्यांक मोर्चाच्या विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्यांना आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील १५ दिवस दौरा करून अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे. विभागीय समितीला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अल्पसंख्यांक समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करायची आहे. अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, इंजिनिअर, उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या धोरणांबाबत चर्चा करायची आहे. समाजातील मौलाना, मदरसा पदाधिकारी यांच्याशीही चर्चा केली जाईल व काँग्रेसने आजवर अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कामाची माहिती दिली जाईल. सोबतच जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाचे संमेलन व शिबिर आयोजित केले जाईल. या सर्वांशी चर्चा करून समोर येणारे प्रश्न व समस्यांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला जाईल. बूथ स्तरावर अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते तयार केले जातील. जिल्हा व तालुक्यातील राजकीय स्थितीचा अभ्यास केला जाईल. यासाठी प्रत्येक विभागीय समितीमध्ये समिती प्रमुख व समन्वयकासह पाच ते सहा सदस्य नियुक्त करण्यात आले आहे. नांदेड व नागपुरात प्रत्येकी सहा सदस्य नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)अशा आहेत विभागनिहाय समित्यानागपूर विभाग- समिती प्रमुख बाबा सिद्दीकी. उपप्रमुख नतकोद्दीन खतीब, सदस्य : ओवेस कादरी समन्वयक, एस. क्यू. जमा, जिया पटेल, मुजीब पठान . अमरावती विभाग - समिती प्रमुख: माजी मंत्री अनिस अहमद, समिती समन्वयक: जब्बार शेख, सदस्य : शकूर नागानी, मो. नदीम, वजाहत मिर्झा. औरंगाबाद विभाग - समिती प्रमुख: असलम शेख, समन्वयक : अहमद हुसैन चाउस, सदस्य : एम. एम. शेख, भिवंडी के मो. अली खान, शेख इब्राहिम. कोकण विभाग - समिती प्रमुख : खा. हुसैन दलवाई.पश्चिम महाराष्ट्र - हाफीज धत्तुरेउत्तर महाराष्ट्र - आ. आसिफ शेख नांदेड विभाग - आ. आरिफ मोहम्मद नसीम खान