शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचही ग्रामपंचायतींवर काँग्रेस गटाचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) संपन्न झाली. काँग्रेस समर्थित ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) संपन्न झाली. काँग्रेस समर्थित गटाने या पाचही ग्रामपंचायतींवर त्यांचा वरचष्मा कायम ठेवला. सेलू (गुमथळा) येथील सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक अविराेध झाली असून, काेहळी येथे अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली.

तालुक्यातील सेलू (गुमथळा) येथे काँग्रेस समर्थित गटाच्या कुंती आसोले यांनी सरपंच तर प्रदीप चनकापुरे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. येथे भाजप समर्थित गटाच्या चित्रा डोईफोडे यांनी सरपंच पदासाठी व प्रकाश पांडे यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले हाेते. परंतु भाजप समर्थित गटाच्या दाेन्ही उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने, कुंती आसोले यांची सरपंच तर प्रदीप चनकापुरे यांची उपसरपंचपदी अविराेध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

सोनेगाव (पोही) येथे सरपंच पदासाठी काँग्रेस समर्थित गटाच्या रूपाली पुनवटकर व भाजप समर्थित गटाच्या माधुरी गायकवाड यांनी तर उपसरपंच पदासाठी काँग्रेस समर्थित गटाच्या गायत्री आंबाेले व भाजप समर्थित गटाचे शरद ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. यात रूपाली पुनवटकर व गायत्री आंबोले यांना प्रत्येकी सात तर माधुरी गायकवाड व शरद ठाकरे यांना प्रत्येकी दोन मते मिळाली. त्यामुळे येथील सरपंचपदी रूपाली पुनवटकर व उपसरपंचपदी गायत्री आंबाेले यांना विजयी घाेषित करण्यात आले.

सोनपूर (आदासा) येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आले हाेते. येथे नीतू सहारे या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची सरपंचपदी अविराेध वर्णी लागली. मात्र, येथे उपसरपंच पदासाठी नीलेश कडू व चेतन निंबाळकर यांच्यात सामना झाला. कडू यांना पाच तर निंबाळकर यांना चार मते मिळाली. त्यामुळे नीलेश कडू यांना विजयी घाेषित करण्यात आले. विशेष म्हणजे, येथील सार्वत्रिक निवडणूक ही बिनविराेध झाली हाेती. त्यामुळे सरपंच व उपसरपंचांची निवडही अविराेध व्हावी, अशी मतदारांची इच्छा हाेती. परंतु, राजकीय हट्टापायी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.

...

सावंगी (ताेमर) येथील सरपंचपद रिक्त

सावंगी (तोमर) येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले हाेते. प्रत्यक्षात या प्रवर्गातील एकही उमेदवार सावंगी (ताेमर) येथे नसल्याने केवळ उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रज्वल तागडे यांनी पाच मते मिळवीत विजय संपादन केला. दुसरीकडे, उमेदवार नसल्याने येथील सरपंचपद रिक्त आहे. काेहळी येथे सरपंच पदासाठी देवराव करडभाजने यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. येथे उपसरपंच पदासाठी काँग्रेस समर्थित गटाचे राजेश माडेकर व अपक्ष देवकांत वानखेडे यांच्यात लढत झाली. यात देवकांत वानखेडे यांना ११ पैकी ६ मते मिळाल्याने, त्यांना विजयी घाेषित करण्यात आले.

....