शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आलेसूर, पुल्लरमध्ये काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) पार पडली. यात आलेसूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) पार पडली. यात आलेसूर व पुल्लर ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित गटाने सत्ता मिळविली. माेखाबर्डी येथे काँग्रेस समर्थित गटातील अंतर्गत मतभेदाचा फायदा घेत भाजप समर्थित गटाने सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.

आलेसूर येथे दिलीप दोडके यांची सरपंचपदी तर राजू बनकर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. दाेघेही काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य आहेत. पुल्लर येथे सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या सोनल तिरपुडे आणि उपसरपंचपदी हिरालाल राऊत यांची निवड करण्यात आली. माेखाबर्डी येथे काँग्रेस समर्थित गटाला अंतर्गत मतभेदाचा फटका बसल्याने भाजप समर्थित गटाने डाव साधला. येथे आ. राजू पारवे यांनी काँग्रेस समर्थित गटाचे तीन व काँग्रेस समर्थित बंडखाेर गटाचे दाेन अशा पाच सदस्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही ग्रामपंचायत काँग्रेस समर्थित गटाकडे जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात हाेती. मात्र, सरपंच व उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या गटाचे सदस्य मतदानाला गैरहजर राहिले. त्यामुळे येथे भाजप समर्थित गटाच्या रूपाली साेनटक्के तर उपसरपंचपदी राेशन गायधने यांनी बाजी मारली.

....

गटनिहाय बलाबल

भिवापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी नऊ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली हाेती. यात आलेसूर व मोखाबर्डी येथे काँग्रेस समर्थित गटांमध्ये लढत झाली. आलेसूर येथे काँग्रेस समर्थित दाेन्ही गटांनी विजय संपादन केल्याने भाजप समर्थित गटाच्या पदरी निराशा पडली. माेखाबर्डी येथे भाजप समर्थित गटाने चार, काँग्रेस समर्थित गटाने तीन तर वसंत ढाेणे यांच्या नेतृत्वातील काँग्रेस समर्थित बंडखाेर गटाने दाेन जागा जिंकल्या. पुल्लर येथे काँग्रेस समर्थित गटाने सहा तर भाजप समर्थित गटाने तीन जागांवर विजय संपादन केला.

....

अंतर्गत कलह भाेवला

माेखाबर्डी हे पंचायत समिती सभापती ममता शेंडे तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंता ढाेणे यांचे मूळ गाव हाेय. वसंता ढाेणे यांच्या पत्नी छाया ढाेणे यांना काँग्रेस गटाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखाेरी करीत पॅनल उभे केले हाेते. मागील पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या ममता शेंडे यांनी अपक्ष छाया ढाेणे यांना पराभूत केले हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र छाया ढाेणे व ममता शेंडे यांचे सासरे तुळशिदास शेंडे यांनी वेगवेगळ्या वाॅर्डमधून निवडणूक लढविली. यात छाया ढाेणे विजयी झाल्या तर तुळशिदास शेंडे यांना पराभवाला सामाेरे जावे लागले. पंचायत समिती निवडणुकीतील कलह या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उफाळून आला. छाया ढाेणे या सरपंचपदाच्या उमेदवार असल्याने ममता शेंडे गटाचे ग्रामपंचायत सदस्य मतदानाला गैरहजर राहिले.