शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वनवे गटावर कारवाईसाठी काँग्रेस ‘बॅकफूट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:59 IST

गटनेता निवडण्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

ठळक मुद्देनोटिसीला उत्तर न देऊनही शांत : न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गटनेता निवडण्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, एकाही नगरसेवकाने मुदतीत स्पष्टीकरण सादर केले नाही. या घटनाक्रमाला सुमारे चार आठवडे होत आले तरी प्रदेश किंवा शहर काँग्रेसने अद्याप संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी पावले उचललेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी काँग्रेस ‘बॅकफूट’वर आली असून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच हालचाली होण्याची शक्यता आहे.प्रदेश काँग्रेसने पाठविलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या गटाचे संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, या निवडीवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी एकत्र येत तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली होती. विभागीय आयुक्तांकडे तसा अर्ज देऊन महापालिका आयुक्तांसमक्ष आपले बहुमतही सिद्ध केले होते. त्यामुळे आयुक्तांनी वनवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाला महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रदेश काँग्रेसनेही न्यायालयीन प्रकरणात अभिजित वंजारी यांना प्रतिनिधी नेमून महाकाळकर यांची नियुक्ती योग्य असल्याचा दावा केला. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसच्या निर्देशावरून शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी वनवे गटाच्या १६ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र दिलेल्या आठ दिवसाच्या मुदतीत एकाही नगरसेवकाने स्पष्टीकरण दिले नाही. वनवे यांच्यासह नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्याला पक्षाकडून अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला आहे तर हर्षलता साबळे यांनी मात्र नोटीस मिळाल्याची कबुली देत दोन- तीन दिवसात स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले.मात्र, मुदतीनंतरही कुणी स्पष्टीकरण दिले नाही. नोटीस जारी झाल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर माजी मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संबंधित नगरसेवकांची बैठक झाली होती. तीत नेत्यांकडून नगरसेवकांना आपण पाठीशी असल्याचा धीर देण्यात आला होता. त्यामुळे संबंधित १६ नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. आपण काहीच नियमबाह्य किंवा पक्षविरोधी केले नाही, असा त्यांचा दावा आहे.लेखाजोखा प्रदेशकडे सादरनोटिसीला एकाही नगरसेवकाने उत्तर दिले नाही याची माहिती शहर काँग्रेसतर्फे प्रदेश काँग्रेसला कळविण्यात आली आहे. त्याचा एक सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. पुढे काय भूमिका घ्यायची यासाठी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांची शहर काँग्रेसला प्रतीक्षा आहे.शहर काँग्रेसकडूनही कारवाई नाहीप्रदेश काँग्रेसने नगरसेवकांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे अधिकार शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी नोटीस बजावली. मात्र, नोटिसीला उत्तर न दिल्यानंतर शहर काँग्रेसकडून कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. संबंधितांना पुन्हा दुसरी शॉर्ट पिरेड नोटीस देण्याचा विचार समोर आला होता. मात्र, तसेही झाले नाही. शहर काँग्रेसने कारवाईसाठी पावले न उचलल्यामुळे वनवे गटाचे मनोबल उंचावले आहे.