शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढ विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

By admin | Updated: July 24, 2016 02:08 IST

देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे

उत्तर नागपुरात आंदोलन : गरिबांवर अन्याय कशासाठी ? नागपूर : देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाचे साठेबाजीवर नियंत्रण नसल्यामुळे त्याचा परिणाम गरीब व मध्यमवर्गीयांवर होत आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात शनिवार बाजारपेठ कमाल चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीने माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शहर ्ध्यक्ष विकास ठाकरे, सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडेय, नगरसेवक संदीप सहारे, मिलिंद चवरे, खुशाल हेडाऊ, मिलिंद सोनटक्के, प्रा.डॉ. जयंत जांभुळकर, नगरसेवक सुरेश जग्याशी, भावना लोणारे, महेंद्र बोरकर, सिंधू उईके, आमीर नूरी, आसीफ शेख, विजयालक्ष्मी हजारे, सलीम खान आदींनी भाग घेतला. यावेळी कुणाल राऊत यांनी महागाईच्या विरोधात सत्ताधारी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था अनियमित झाली आहे. पूर्वी १०० रुपयात भरणारी भाजीपाल्याची पिशवी आज ६०० रुपयातही भरत नाही. सामान्य जनतेला डाळ व भाजीपाल्यापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र शासन रचत आहे. शासन वचननाम्यात फोल ठरल्याची टीका त्यांनी केली. आंदोलनात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान महिलांनी भाववाढविरोधातील अ‍ॅप्रॉन घालून कांदा, भेंडी, मिरचीच्या माळा टाकून महागाईचा विरोध करीत जनजागृती केली. काँग्रेस सरकार सत्ताधारी भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्यशिवाय राहणार नसल्याचे नगरसेवक संदीप सहारे यांनी सांगितले. आंदोलनात उना गावात दलितांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. जनजागृती अभियानात युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेसचे विनोद सोनकर, हरिभाऊ किरपाने, माजी नगरसेवक मार्टिन मोरेश, हिरा गेडाम, मन्सूर खान, ममता गेडाम, तुषार नंदागवळी, सलीम मस्ताना, गौतम अंबादे, किरण यादव, बेबी गौरीकर, इरशाद शेख, राकेश निखार, राकेश निकोसे, खतीजा अली, प्रीतेश पाटील, मोसीन खान, आशिष साखरे, जय मोरयानी, अरमान खान, ममता सयाम, सुनंदा राऊत आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)