नागपूर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरातील विविध पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचण असताना इंधन दरवाढीमुळे अक्षरश: आर्थिक कोंडी होत आहे. मात्र केंद्र शासनाला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
विविध पेट्रोल पंपांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये प्रदेश काँग्रेस सचिव उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, पंकज निघोट, राजेश पौनीकर, पंकज थोरात, युवराज वैद्य, रजत देशमुख, इरशाद मलिक, दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, अब्दुल शकील, गोपाल पट्टम, सुनीता ढोले, ज्ञानेश्वर ठाकरे, मोतीराम मोहाडीकर, संदेश सिंगलकर, राजकुमार कमनानी, युवराज शिव, मुन्ना वर्मा, राजेघ उघडे, शत्रुघ्न महतो, बबलू तिवारी, सूरज शर्मा, रामभाऊ बांते, योगेश येरमवार, मीडिया सेलचे सरचिटणीस आकाश तायवाडे यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.