शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

ओसीडब्ल्यू व दहनघाट लाकूड घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: April 30, 2016 03:01 IST

ओसीडब्ल्यू या पाणीपुरवठा कंपनीतर्फे नागरिकांची लूट होत असतानाही या कंपनीवर कारवाई का केली जात नाही,

आयुक्तांना दीड तास घेराव : महेश ट्रेडिंगला काळ्या यादीत टाका नागपूर : ओसीडब्ल्यू या पाणीपुरवठा कंपनीतर्फे नागरिकांची लूट होत असतानाही या कंपनीवर कारवाई का केली जात नाही, तसेच दहनघाटांवर लाकूड पुरवठ्यात घोटाळा करणाऱ्या महेश ट्रेडिंग कंपनीला काळ्या यादीत टाकून कंत्राटदारावर गुन्हा दाखल का केला जात नाही, असे प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसने शुक्रवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना तब्बल दीड तास घेराव घातला. या दोन्ही मुद्यांवर आठवडाभरात आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी दुपारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कक्षात धडकले. घोटाळेबाजांना कुणाच्या दबावाखाली संरक्षण दिले जात आहे, असा सवाल करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. ठाकरे म्हणाले, दहनघाटावरील लाकूड पुरवठ्यात महेश ट्रेडिंग कंपनीने घोटाळा केल्याचे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही दोन वर्षे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली नाही.महापालिकेतर्फे नुकतेच संबंधित कंत्राटदाराची पोलिसात तक्रार करण्यात आली पण तक्रारीत कंत्राटदाराने नुकसान भरपाई दिल्याचा उल्लेख करण्यात आला. एका कंत्राटदाराला वाचविण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने कुणाच्या दबावात घेतली, असा सवाल ठाकरे यांनी केला. महेश ट्रेडिंग कंपनीच्या नोंदणीत असलेला पत्ता व दहनघाट घोटाळ्यातील कंत्राटदाराचा पत्ता १४४, परिणय अपार्टमेंट असा दिला आहे. नगरसेवक परिणय फुके यांचा महापालिकेच्या डायरीतही हाच पत्ता दिला आहे. यावरून फुके यांचा या घोटाळ्याची संबंध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे फुके यांचे सदस्यत्व रद्द करावे व महेश ट्रेडिंग कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शनिवारपर्यंत यावर निर्णय घेतला नाही तर महापालिकेवर प्रेतयात्रा काढली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महेश ट्रेडिंगला ब्लॅक लिस्ट केले जाईल व यापुढील निविदा प्रक्रियेत भाग घेऊ दिला जाणार नाही, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)ओसीडब्ल्यूवर नाराजीनगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, दीपक कापसे, सरस्वती सलामे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, अरुण डवरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, दीपक वानखेड, तानाजी वनवे, इंदू ठाकूर आदींनी त्यांच्या भागात ओसीडब्ल्यूतर्फे नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना भरमसाट बिल पाठविण्यात येत असल्याची तक्रार केली. संबंधित भरमसाठ बिले विकास ठाकरे यांनी आयुक्तांकडे सादर केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये फक्त तीन टँकर सुरू आहेत. फ्लॅटस्कीममध्ये नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. तरीही बिल येत आहे, असे त्यांनी सांगितले. ही बिले पाहून आयुक्त हर्डीकर यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना फटकारले व या बिलात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांच्या पाणीपुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी ओसीडब्ल्यूचा कर्मचारी, महापालिकेचा कर्मचारी व नगरसेवकाचा प्रतिनिधी अशी समिती तयार करावी, या समितीने पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिले. यानंतरही पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी कायम राहिल्या तर ओसीडब्ल्यूवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आंदोलकांना आश्वस्त केले. वाढील बिल भरू नकाओसीडब्ल्यूतर्फे नागरिकांना भरमसाट बिल पाठविले जात आहे. नागरिकांनी बिल भरले नाही म्हणून त्यांना धमकावले जाते व पाणीपुरवठा खंडित केला जातो. पाणी वापरले नसतानाही नागरिक धास्तीपोटी बिल भरत आहेत. नागरिकांना असे वाढीव बिल आले तर त्यांनी ते भरू नये. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात ते आणून द्यावे. आपण त्यांच्यावतीने आयुक्त व ओसीडब्ल्यूला जाब विचारू, बिल कमी करण्यासाठी संघर्ष करू, असे आवाहन विकास ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.