शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:44 IST

काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपुगलिया व प्रदेश काँग्रेसचा एकाचवेळी वेगवेगळा मेळावा :

प्रदेशच्या रॅलीत चव्हाण तर पुगलियांच्या रॅलीत पाच माजी मंत्रीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार विरुद्ध संघर्षांचा बिगुल फुंकत ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘विभागीय जनआक्रोश मेळावा’ आयोजित केला आहे तर तेथेच त्याच दिवशी, त्याच वेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी बाजूच्याच मैैदानावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. तीत विदर्भातील ‘निष्ठावान’ असंतुष्ट नेत्यांना निमंत्रित केले आहे. आमने-सामने होत असलेल्या या दोन मेळाव्यांमुळे काँग्रेसमधील ‘आक्रोश’ प्रखरतेने चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात येत चंद्रपूरच्या मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच सोमवारी पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी व कामगार रॅली घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुगलिया यांनी मंगळवारी नागपुरात येत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींची भेट घेत या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या वेळी या सर्व नेत्यांची सिव्हील लाईन्समधील चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तीत पुढील कार्यक्रमांची रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर पुगलिया यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरातील संबंधित नेते मेळाव्याला येणार असून शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे देखील समर्थकांसह उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. माजी खा. गेव्ह आवारी यांनी नागपुरातील संबंधित नेत्यांसह तीन हजार कार्यकर्ते चंद्रूपरच्या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी यापूर्वीच प्रदेश काँग्रेसवर अविश्वास दाखवित ‘विदर्भ काँग्रेस’ स्थापन करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे.अशोक चव्हाण ‘केअर टेकर’प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी हे सद्यस्थितीत ‘केअर टेकर’ आहेत. प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्व अधिकार उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत. माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार व अनंतराव घारड यांच्या सल्ल्याप्रमाणे चव्हाण वागत आहेत. मी अ.भा. काँग्रेस समितीचा सदस्य आहे. असे असतानाही आपले नाव प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले नाही. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ प्रदेश प्रतिनिधींची नावे निश्चित केली. पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती लुडबूड करीत आहेत.- नरेश पुगलिया, माजी खासदार