पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावीनागपूर : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकात जाऊन एस.टी. बस कंडक्टर कल्पना लकडे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिसांनी दोषींवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिवाकर रावते यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत विभाग नियंत्रक आर.डी. घाटोळे हे होते. अवैध वाहतूक प्रवासी करणाऱ्या चार जणांनी कल्पना लकडे यांना चामट चौकात बेदम मारहाण केली होती.(प्रतिनिधी)
कंडक्टर कल्पना लकडे यांची रावते यांनी घेतली भेट
By admin | Updated: December 27, 2015 03:22 IST