शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांकडून सक्तीची वसुली

By admin | Updated: March 8, 2017 02:36 IST

शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) ३१ मार्च २०१७ पर्यंत दोन लाख कोटी रुपये आयकर संग्रहणाचे लक्ष्य ठेवले आहे.

९ मार्चनंतर आयकर विभागाची धडक मोहीम : चौकशी व धाडीचे सत्र मोरेश्वर मानापुरे   नागपूर शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) ३१ मार्च २०१७ पर्यंत दोन लाख कोटी रुपये आयकर संग्रहणाचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आयकर खात्याचा अन्वेषण विभाग, टी अ‍ॅण्ड सी विभाग आणि विभागाचे नियमित अधिकारी करदात्यांची चौकशी आणि त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. ही कारवाई उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर अर्थात ९ मार्चपासून जोरात सुरू होणार आहे. ४० कोटी भरण्याची करदात्यांची हमी ही योजना कठोर आहे. योजनेत सहभागी न झालेला आणि नंतर काळेधन पकडल्या गेलेल्या करदात्याकडून कर व दंडासह ८३.२५ टक्के करवसुली करण्यात येणार आहे. विभागाच्या दबावाने लोक कर भरत आहेत. नागपुरात काही करदात्यांनी योजनेत ४० कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. तशी हमी दिल्याची माहिती आयकरतज्ज्ञ सीए कैलास जोगानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. को-आॅपरेटिव्ह व वित्तीय संस्था पुन्हा रडारवर नोटाबंदीनंतर बँकेत जुन्या नोटा जमा करणारे मोठे ठेवीदार आणि जुन्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार नसलेल्या को-आॅपरेटिव्ह व वित्तीय संस्थांवर विभाग नव्याने कारवाई करणार आहे. लोकांना त्रास देणार नाही, असे सरकारचे म्हटले असले तरीही कर संग्रहणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अधिकारी कठोर पावले उचलत आहेत. यापूर्वी नागपुरात २५ पेक्षा जास्त को-आॅपरेटिव्ह सोसायट्यांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. काही सोसायट्यांवर पुन्हा कारवाई करणार आहे. स्रोत न सांगितल्यास ८३.२५ टक्के कर नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेले सर्वच काळेधन असल्याचा सरकारचा गैरसमज आहे. पण एखाद्या महिलेचा पती शासकीय कर्मचारी असेल आणि तिने जमा केलेला पैसा बँकेत जमा केला असेल तर त्यावर कर लागणार नाही. तसेच सोने वा घर विकून आलेला पैसा बँकेत जमा केला असेल तसेच दुकानदार वा कंत्राटदाराला स्रोत सांगून टप्प्यानुसार कर भरायचा आहे, असे जोगानी यांनी सांगितले. ईडीला खाते गोठविण्याचे अधिकार कारवाईदरम्यान कर आणि दंड वसुलीव्यतिरिक्त खाते गोठविण्याचे अधिकार नाहीत. पण अनेक दिवसांपर्यंत व्यवहार न झालेल्या खात्यात नोटाबंदीनंतर लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल तर त्या खातेदाराला आयकर विभाग नोटीस पाठवित आहे. त्याने पैशाचा स्रोत न सांगता दुसऱ्याचे नाव सांगितले तर १ नोव्हेंबर २०१६ पासून अमलात असलेल्या बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत ती रक्कम दंडासह सरकारच्या खात्यात जमा होणार आहे. शिवाय काळापैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) खाते गोठविण्याचे अधिकार आहेत. सर्वे व धाडी टाकणे चुकीचे कलम (१३१) (१३३)(६) अंतर्गत करदात्याला कार्यालयात बोलावून चौकशी करण्याचे अधिकार आहेत. पण तसे न करता करदात्यावर दबाव टाकण्यासाठी अधिकारी करदात्याच्या कार्यालयात जात आहे. अधिकाऱ्यांनी अशी कारवाई थांबवावी, असे जोगानी यांनी स्पष्ट केले. दंड वसुलीचा कायदा चुकीचा अर्थसंकल्पातील कायद्यात बदल करून ८३.२५ टक्के कर आणि दंड वसुलीचा कायदा चुकीचा आहे. एखादा करदाता किंवा औद्योगिक असोसिएशनने या कायद्याला कायद्याच्या कलम(२०)नुसार कोर्टात आव्हान दिले तर निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो. हा कायदा १ एप्रिल २०१६ पासून अंमलात आला आहे. १ एप्रिलनंतर बँकेत जमा रकमेवर करदात्याला स्रोत सांगावा लागणार आहे. नाही सांगितला तर त्याच्याकडूनही कलम(११५बीबीई)नुसार ८३.२५ टक्के कर व दंड वसुली करण्यात येणार आहे. करदात्यांकडून अनावश्यक कर वसुली चुकीची असल्याचे जोगानी म्हणाले. १८ लाख लोकांना नोटिसा बँकेत जुन्या नोटा भरण्याची ३० डिसेंबर २०१६ ही मुदत संपल्यानंतर बँकेने खातेदाराच्या खात्यातील वर्षभरातील रकमेचा व्यवहार, पत्ता आणि पॅन विभागाकडे पाठविला आहे. विभागाने ही माहिती संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांकडे पाठवून संपूर्ण देशात चौकशी व धाडसत्र सुरू केले आहे. नोटाबंदीनंतर विभागाने देशात १८ लाख लोकांना आॅनलाईन नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी नऊ लाख लोकांनी नोटीसला उत्तर दिले आहे. उत्तर न दिलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.