शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्प्रेसरचा स्फोट, एकाचा मृत्यू

By admin | Updated: February 19, 2017 00:00 IST

अजनीतील जादूमहल जवळ एका दुकानात हवा भरण्याच्या (एअर कॉम्प्रेसर) मशीनचा जोरदार स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 -  अजनीतील जादूमहल जवळ एका दुकानात हवा भरण्याच्या (एअर कॉम्प्रेसर) मशीनचा जोरदार स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. शरद अजाबराव राऊत (वय ३५) असे स्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
जखमी असलेल्या रमेश शंकर बागडे (वय ४२, रा. बिडीपेठ) याचे जादूमहल जवळच्या सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत मित्तल इलेक्ट्रीकल्स नामक छोटेसे दुकान आहे. शरद हा रमेशचा मित्र होय. जोडधंदा म्हणून रमेशने वाहनात हवा भरण्याची (एअर कॉम्प्रेसर) एक जुनी मशीन ४,५०० रुपयात आजच विकत घेतली होती. ही मशीन घेऊन रमेश आणि शरद दुपारी २.३०  वाजता रमेशच्या दुकानात आले. त्यांनी मशीन सुरू करताच मोठा स्फोट झाला आणि शरद तसेच रमेश दोघेही गंभीर जखमी झाले. स्फोट एवढा जोरदार होता की मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. शरद मशीनच्या बाजूलाच होता. त्यामुळे त्याचा एक पाय पुरता छिन्नविछिन्न झाला. गंभीर अवस्थेत या दोघांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री ८ च्या सुमारास डॉक्टरांनी शरदला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस घटनास्थळी आणि नंतर मेडिकलमध्ये पोहचले.  या घटनेमुळे परिसरात काही वेळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 
 
कामाच्या शोधात आला, अन्...
 स्फोटात ठार झालेला शरद मूळचा वलनी येथील रहिवासी होय. त्याला पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे. शरदसोबत पटत नसल्यामुळे त्याची पत्नी  तिच्या मुलीसह फुले झोपडपट्टीत माहेरी राहायला आली. पत्नी व मुलीची आठवण येत असल्यामुळे नागपुरातच कामधंदा करून येथेच राहायच्या विचाराने आज शरद नागपुरात आला. मित्र रमेशकडे गेल्यानंतर त्याने येथे काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. दरम्यान, रमेशने हवा भरण्याची मशीन विकत घेतल्याचे सांगून ती आणण्यासाठी शरदला सोबत नेले. शरद आणि रमेश दोघे मशीन घेऊन आले आणि ‘ट्रायल’ घेण्यासाठी या दोघांनी ती मशीन सुरू करून पाहिली आणि स्फोट झाला अन् त्यात शरदचा जीव गेला.