शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नवमाध्यमांचा समाजमनावर संमिश्र परिणाम

By admin | Updated: December 8, 2014 00:54 IST

माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे.

मैत्री परिवार संस्था : हेमंत व्याख्यानमाला नागपूर : माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे. यात खाजगी वाहिन्यांना आणि प्रिंट माध्यमांना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मुळात प्रसार माध्यमांचा समाजमनावर परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. सध्या वेगवेगळ्या स्वरूपात येणाऱ्या नवमाध्यमांमुळे समाजमन घुसळून निघते आहे. या नवमाध्यमांचा समाजावर होणारा परिणाम सध्या तरी संमिश्रच आहे, असे मत आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेच्यावतीने हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. यात ‘नवमाध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम’ या विषयावर मंदार फणसे तर ‘बदलत्या राजकीय स्थितीत माध्यमांकडून अपेक्षा’ या विषयावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंदार फणसे म्हणाले, प्रिंट माध्यमांना मात्र स्वत:चे अस्तित्व आहे, ते केव्हाही तपासता येऊ शकते. येणाऱ्या काळात ४ जी आणि ७ जी मुळे माहिती तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे. त्याचा परिणाम समाजमनावर होईलच. त्यामुळे कुठलीही माहिती कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही. अशा स्थितीत माध्यमांना अधिक जबाबदारीने काम करावे लागणार असून, प्रत्यक्ष जनतेशी संवादाची प्रक्रियाही वाढवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात मोबाईलच्या स्क्रीनवरच सारे जग सामावण्याचे चिन्ह आहे, असे ते म्हणाले. माध्यमांनी विश्वासार्हता गमावू नये : माधव भंडारीमाध्यमांची निर्मितीच समाजमनाला प्रभावित करून निकोप समाजनिर्मितीसाठी झाली आहे. पण तोच उद्देश केवळ व्यावसायिकता पाहताना हरवीत चालला असून, त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता संपत आहे, ही गंभीर बाब आहे. माध्यमांनी जबाबदारीने वृत्त संकलन करून लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावू नये, असे मत माधव भंडारी यांनी व्यक्त केले. टीआरपीच्या चक्रात फसण्यापेक्षा आपली बातमीच इतकी पक्की आणि प्रगल्भ असली तर ती नक्कीच विकल्या जाते. प्रसार माध्यमांनी विरोधाचा सूर लावल्यावरही सत्ताबदल झाला. राजकीय पक्षांवर टीका करा, त्यांना चुका दाखवा, पण जनतेला ग्राह्य धरण्याची चूक करू नका, हे या सत्ताबदलाने सिद्ध झाले आहे. समाजाची प्रगल्भता आता माध्यमांनी स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)