शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील घाट रोडचे काम सात दिवसांत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:31 IST

बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्टरी-घाट रोडदरम्यान रखडलेल्या कामासाठी कंत्राटदाराला अल्टीमेटम दिला.

ठळक मुद्दे कार्यकारी महापौरांचे आदेश : कंत्राटदारालाही अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्टरी-घाट रोडदरम्यान रखडलेल्या कामासाठी कंत्राटदाराला अल्टीमेटम दिला.पार्डीकर आणि पोहाणे यांनी या दोन्ही रस्त्यांची गुरुवारी पाहणी केली. प्रारंभी बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री निधीतून होत असून गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी रस्त्याच्या कामाची माहिती देत कामात येणारे अडथळे सांगितले. काही अडचण आल्यास पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात यावी. उर्वरित कामास सोमवारी सुरुवात करून गुरुवारपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश पार्डीकर यांनी दिले.यानंतर इमामवाडा-डालडा फॅक्टरी-ग्रेट नाग रोड-आयसोलेशन हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. संबंधित काम जे.पी. एंटरप्राईजेसकडे असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे येत असलेल्या समस्याही त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जाणून घेतल्या. यावेळी पोहाणे यांनी कंत्राटदाराशी मोबाईलवरून संपर्क साधत कामासंदर्भात अल्टीमेटम दिला. पाच महिन्यांपासून काम रखडले असून जर कंत्राटातील अटी व नियमांचे पालन झाले नाही तर देयके थांबविण्यात येतील, असा अल्टीमेटम त्यांनी दिला. या दोन्ही कामांचा पाठपुरावा आपण स्वत: करणार असून तातडीने हे बांधकाम पूर्ण करण्यात यावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका