शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या तयारीची कामे दोन दिवसात पूर्ण करा : डॉ. संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 21:53 IST

मुख्यमंत्र्याचे निवासस्थान रामगिरी, हैद्राबाद हाऊस, देवगिरी तसेच इतर व्यसस्थेसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

ठळक मुद्देविभागनिहाय आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी निवास व्यवस्थेसह विविध मंत्रालयीन विभागासाठी दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने करावयाच्या व्यवस्थेबाबत सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून दिलेली संपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी. तसेच मुख्यमंत्र्याचे निवासस्थान रामगिरी, हैद्राबाद हाऊस, देवगिरी तसेच इतर व्यसस्थेसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवास, विधानभवन, रविभवन येथील निवास व्यवस्था तसेच हैद्र्राबाद हाऊस येथील विविध विभागांच्या कार्यालय व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर विभागप्रमुखांच्या बैठकीत कामांचा आढावा घेतला. त्याप्रसंगी डॉ. संजीव कुमार बोलत होते. आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र्र ठाकरे, अधीक्षक अभियंता व्ही.डी. सरदेशमुख, भारत संचार निगमचे वाणिज्य अधिकारी संतोष सुरपाटणे, पोलीस उपायुक्तश्वेता खेडकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपायक्त मिलींद साळवे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपायुक्त के.एन.के. राव, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रविंद्र कुंभारे, मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र्र खजांजी आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशननिमित्त करावयाच्या विविध व्यवस्थेचा आढावा विभागीय आयक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभाग व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे निवासाची व्यवस्था करण्यात येते. निवासव्यवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपलब्ध व्यवस्था तसेच निवासासाठी करावयाची कार्यवाही यासंदर्भात अहवाल तयार करण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त म्हणाले की, विधानमंडळाचे सभापती, अध्यक्ष, उपसभापती, विरोधी पक्षनेते तसेच मंत्री मंडळातील सदस्यांसाठी रविभवन येथील कुटीर आदीबाबत व्यवस्थेची पुस्तिका तयार करण्यात यावी व त्यानुसार मंजुरी घेवून व्यवस्था अंतिम करावी. सुयोग येथे पत्रकारांसाठीची निवास व्यवस्था तसेच अधिवेशन काळात भेट देणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण करावी.वाहन व्यवस्थेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण कराअधिवेशन काळात करावयाची वाहन व्यवस्था करताना विभागातून तसेच विभागाबाहेरील शासकीय वाहने अधिग्रहित करणे तसेच शासकीय वाहने वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. अधिवेशनासाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यकता भासल्यास कंत्राटी पध्दतीने वाहन पुरविण्यासाठी शासनाच्या विहीत नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अधिवेशनासाठी २७१ दूरध्वनीचा वापर करण्यात येतो. दूरध्वनी व्यवस्था अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुरळीत सुरु व्हावी यादृष्टीने संपर्क अधिकाऱ्याने नियोजन करावे. नागपूर अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखताना आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही विभागीय आयुक्त यांनी सूचना केल्यात.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर