शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बी.एड.घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

By admin | Updated: February 4, 2016 02:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

२ कर्मचारी, २ माजी विभागप्रमुखांचा समावेश : शिक्षण क्षेत्रात खळबळनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यासंदर्भात विभागप्रमुख डॉ.सुषमा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अपहाराचा ठपका लावण्यात आलेल्या २ कर्मचाऱ्यांसोबतच २ माजी विभागप्रमुखांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत. बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात २०१० ते २०१२ या तीन वर्षांत उच्च श्रेणी लिपिक प्रमोद देशपांडे व श्रीकांत पोलके यांनी विविध तारखांना ‘बेरर’ धनादेशाद्वारे संंबंधित रकमेची परस्पर उचल केली. या कालावधीत एकदाही त्यांच्या या व्यवहाराची तत्कालीन अधिकाऱ्यांनी पडताळणी केली नाही. शिवाय ही बाब समोर आल्यानंतर याचे ‘आॅडिट’देखील झाले नाही. काही महिन्यांअगोदर याची गंभीर दखल घेत ‘आॅडिट’ करण्यास सुरुवात करण्यात आली व या कालावधीत ४१ ते ४५ लाख रुपयाचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीची बैठक झाली असता त्यात यासंबंधात प्रश्न उपस्थित करण्यात आले व एकूणच कारभाराबाबत कुलगुरूंनी नाराजी व्यक्त केली. या समितीच्या बैठकीतच पोलीस तक्रार करण्याबाबत आग्रह धरण्यात आला होता. कुलगुरूंनी बैठकीच्या कार्यवृत्तावर स्वाक्षऱ्या केल्या व बुधवारी सायंकाळी विभागप्रमुखांना तातडीने पोलीस तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ.शर्मा यांनी रात्री अंबाझरी पोलीस ठाणे गाठले व पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या अपहारात सहभागी असल्याचा ठपका असलेले उच्च श्रेणी लिपीक प्रमोद देशपांडे व श्रीकांत पोलके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु नेमक्या कोणत्या २ विभागप्रमुखांचे यात नाव आहे, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. डॉ.शर्मा यांना संपर्क केला असता त्यांनी तक्रार दाखल केली असल्याचे स्पष्ट केले. परंतु इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.(प्रतिनिधी)