शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा नको समन्वय हवा

By admin | Updated: October 17, 2015 03:20 IST

क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.

‘लोकमत’ व्यासपीठ : विविध क्षेत्रातील महिलांनी व्यक्त केले मतनागपूर : क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. महिलांनी स्वत:ला विविध क्षेत्रात सिद्ध केले असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि दुय्यमच आहे. महिलांच्या बाबतीत चांगली-वाईट संमिश्रता आहे. वैचारिकदृष्ट्या सुशिक्षित महिलाही स्वतंत्र झालेल्या नाहीत. पत्नी यशस्वी झालेली हवी आहे पण ती स्वत:पेक्षा समोर गेलेली मात्र चालत नाही. यासाठी समाजाची मानसिकताच बदलणे गरजेचे आहे. स्पर्धा नव्हे स्त्री-पुरूषांमधला समन्वय विकसित होण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी शुक्रवारी व्यक्त केले. नवरात्रौत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत सामाजिक क्षेत्रातील महिलांनी स्त्रीविश्वाचा वेध, बदलते स्वरूप आणि आव्हाने या विषयांवर विचारमंथन केले. (प्रतिनिधी)स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करीत आहेत. त्यांच्यात काही करण्याची क्षमता आहे आणि इच्छाही पण त्यांना संधी मिळत नाही. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी प्रामुख्याने आई महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मुलांना वाढवितानाच त्यांच्यावर समानतेचा संस्कार केला तर पुरुषी मानसिकतेच्या प्रश्नामुळे स्त्रियांचे होणारे नुकसान सावरता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक आई सक्षम झाली पाहिजे. -डॉ. सरिता मोवाडे एस.एस. टेक्नोव्हिजन अँड इकोसोल्युशन महिलांच्या शक्तीबद्दल समाजात बोलले जाते पण त्यांना स्थान मात्र दुय्यमच दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीत तफावत आहेच. स्त्री सुशिक्षित असली तरी निर्णयक्षमतेचा अधिकार तिला नाही. पत्नी तिच्या क्षेत्रात यशस्वी असावी पण स्वत:पेक्षा समोर गेलेली आवडत नाही. समाजाला त्यासाठी वैचारिक बैठकच बदलावी लागेल. पालकांनी मुलांना समृद्ध करताना हा संस्कार बालपणापासून दिला तर समाजही बदलेल. - डॉ. सीमा दंदेप्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञप्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करुन ती एखादा उद्योग उभारु शकते आणि आर्थिक बाबतीत सक्षम होऊ शकते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच तिच्या प्रगतीत बाधा येतात पण तिला व्यवसाय करण्याची संधी नाकारली जाते. त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा सुशिक्षित स्त्रियांनाही नोकरी करण्यापासून मज्जाव केला जातो. हे थांबले पाहिजे. -वंदना शर्मा, व्हीआयएच्या महिला विभाग अध्यक्षमहिलांच्या बाबतीत विचार करताना ग्रामीण आणि शहरी स्त्रीचा वेगवेगळा विचार करावा लागेल. ग्रामीण भागात महिला स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसतात. पण अद्यापही काही निर्णय घेताना महिलांमध्ये विश्वास नसतो. काही निर्णय पुरुषांनीच घ्यावे, असे तिला वाटते. या स्थितीत बदल होत आहे आणि भविष्यात महिलाच वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्यांत आणि शिक्षणात मुलींचा टक्का वाढतो आहे. स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा व्यक्ती म्हणून आपली दृष्टी विकसित केली पाहिजे. - ज्योती पाटील, प्राचार्या रेणुका महाविद्यालय