शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

निष्काळजीपणा असला तरी भरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:32 IST

रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशाच्या वारसदारांना आठ लाख रुपये मंजूर

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. हा निर्णय रेल्वे अपघात पीडितांसाठी उपयोगी सिद्ध होणार आहे.फिरदौस कौसर या ४ फेब्रुवारी २०१० रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुरातील अजनी येथून बडनेराला जात होत्या. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे रेल्वेचे अधिकृत तिकीट होते. त्यामुळे वारसदार अब्दुल रशीद व परवीन बानो यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने ४ आॅगस्ट २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. फिरदौस कौसर या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे रेल्वेतून खाली पडल्या. परिणामी, भरपाई देता येणार नाही असे या वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले. त्याविरुद्ध वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे भूमिका मांडून वारसदारांना चार महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मध्य रेल्वेला दिला.

ही फौजदारी कृती नव्हेरेल्वे प्रवाशाने निष्काळजीपणा करणे ही फौजदारी कृती नव्हे. त्यामुळे निष्काळजीपणाच्या कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही. प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना किंवा रेल्वेत चढताना खाली पडणे ही दुर्दैवी घटना आहे. करिता वारसदार भरपाईस पात्र ठरतात असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय