नागपूर : शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे राज्यपालांना देण्यात आले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद बदलविण्यात यावे, या विभागाच्या मंत्रिपदी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून ते राहिले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्याकडून पद काढण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे, अनिल मेश्राम, आनंद नायर, चंद्रशेखर झा, आतिश राठोड, अर्जुन गालफाडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST