शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

 शेतकऱ्याला  नुकसान भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:57 IST

शॉर्ट सर्किट होऊन उसाचे पीक जळाल्यामुळे काटोल तालुक्यातील एका  शेतकऱ्याला  एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने महावितरण कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला ग्राहक मंचचा महावितरणला दणका

आॅनलाईन लोकमतनागपूर : शॉर्ट सर्किट होऊन उसाचे पीक जळाल्यामुळे काटोल तालुक्यातील एका  शेतकऱ्याला  एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने महावितरण कंपनीला दिला आहे.राजेंद्र बंदे असे  शेतकऱ्याचे नाव असून, ते सोनोली येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे बंदे यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यासाठी त्यांना १५ हजार रुपये मोबदला व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यात यावे, असे निर्देशही मंचाने महावितरणला दिले आहेत. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंचाचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्या चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला असून, त्यामुळे  शेतकऱ्यास छळनाऱ्या महावितरणला दणका बसला आहे.तक्रारीतील माहितीनुसार, बंदे यांच्याकडे चार हेक्टर शेती आहे. २०११-२०१२ मध्ये त्यांनी १.२० हेक्टर शेतात ऊस पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातून वीजवाहिनी गेली आहे. त्यावेळी वीजवाहिनीच्या तारा खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे बंदे यांनी १६ नोव्हेंबर २०११ रोजी महावितरणच्या कार्यालयात तक्रार दिली होती. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान, २२ फेब्रुवारी २०१२ रोजी वीजवाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन ऊस पिकाला आग लागली. त्यात पिकाचे नुकसान झाले.घटनेच्या तक्रारीनंतर पोलीस व उपविभागीय अधिकाऱ्यांनी  घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर बंदे यांनी आवश्यक कागदपत्रांसह नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला, पण त्यांचा अर्ज महावितरणने फेटाळून लावला. परिणामी त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून दोन लाख ७० हजार रुपये नुकसान भरपाई, मानसिक व शारीरिक त्रासाचा मोबदला म्हणून ५० हजार रुपये तर, तक्रारीच्या खर्चापोटी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मंचाने विविध बाबी लक्षात घेता, वरीलप्रमाणे निर्णय दिला.महावितरणने आरोप फेटाळलेमहावितरणने स्वत:वरील आरोप फेटाळले होते. वीजवाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची व त्यामुळे उसाचे पीक जळाल्याची बाब कंपनीने अमान्य केली होती. सुकलेली पाने जळाल्यामुळे उसाच्या पिकाला आग लागली. त्याला कंपनीचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा कारणीभूत नाही, असा दावा मंचासमक्ष करण्यात आला होता तसेच तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली होती.

असा आहे मंचाचा निष्कर्षकाटोल तहसीलदारांनी ४ सप्टेंबर २०१२ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात उसाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. महावितरणचे उप-अभियंता यांचा पाहणी अहवाल व तहसीलदारांचे प्रमाणपत्र यांचा विचार केल्यास शेतातील वीज वाहिनीखाली उसाचे पीक होते व वीज वाहिनीच्या तारा लोंबकळत होत्या हे स्पष्ट होते. तहसीलदारांच्या प्रमाणपत्रावर महावितरणने आक्षेप घेतला नाही. परिणामी एकंदर परिस्थितीचा विचार करता उसाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा निष्कर्ष निघतो असे मंचाने निर्णयात म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीCourtन्यायालय