शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

श्रमाच्या समिधा अन् रस्त्याचा यज्ञ

By admin | Updated: August 24, 2015 02:41 IST

मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते.

आदर्श कार्य : सेवानिवृत्त फुलझेलेंचा विधायक पुढाकारलोकमत प्रेरणावाटनागपूर : मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते. एम.पी. फुलझेले त्यातलेच एक़ सेवानिवृत्त फुलझेले हे मूळचे नागपूरचेच असून ते सध्या दिल्लीत राहतात. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे. त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिली पायीसुद्धा जाणे कठीण होते. हे चित्र बदलण्यासाठी फुलझेले यांनी पुढाकार घेतला आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कच्चा पुलाच्या जागी पक्का पूल तयार झाला. गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला.नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असले तरी नागपूरच्या सभोवतालच्या गावांची परिस्थिती अजूनही दयनीय अशीच आहे. नागपूरपासून २० कि.मी. अंतरावर पारशिवनी तालुक्यातील ताडसा ते मौदा या रोडवर निरज खंडारा (घटाटे ) हे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून जवळपास तीन किलोमीटर आत हे गाव आहे. फुलझेले हे केंद्रीय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. एस.एस.टी. अधिकाऱ्यांना ते विविध योजनांविषयी मार्गदर्शन करीत असतात. या गावात फुलझेले यांनी एक शेत घेतले असून त्यात त्यांनी ट्रेनिंग सेटर उभारले आहेत. यासाठी त्यांचे नागपुरात येणे-जाणे असते. २००७ सालची ही गोष्ट आहे. मुख्य रस्त्यापासून आत गावाला जाणारा रस्ता हा केवळ मातीचाच होता. रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर तीन-चार पाईप टाकून पूल तयार करण्यात आला होता. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे. त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिलीच पायीसुद्धा जाणे कठीण होते. पावसाळ्यात या गावाचा संपर्क इतरांशी नाहीच्या बरोबरच राहत असे. त्याच दरम्यान फुलझेले यांचे या गावात येणे झाले. त्यांनाही या रस्त्यामुळे मोठी अडचण होऊ लागली. केंद्र शासनात वरिष्ठ अधिकारी राहिल्यामुळे त्यानी शासन दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गावातील वरिष्ठ व ज्येष्ठ मान्यवर नागरिकांना जागृत केले. गावकऱ्यांचीही त्यांना साथ मिळाली. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. नाव ग्राम पंचायतीचे राहत असे आणि पत्रव्यवहार स्वत: फुलझेले करायचे. यात दोन चार वर्षे उलटली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मौद्यात एनटीपीसीचा मोठा प्रकल्प आहे. त्यांच्या सीएसआर निधीतून गावकऱ्यांना रस्त्यासाठी मदत होऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आली. याचदरम्यान त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सुद्धा काही एनटीपीसीचे अधिकारी सहभागी झाल्याने त्यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यातून सीएसआर ही योजना गावकऱ्यांना समजावून सांगितली. मोठमोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी काही निधी खर्च करावा लागतो. आपल्या क्षेत्रात एनटीपीसी सारखा मोठा प्रकल्प आहे. त्यांना आपण रस्ता बांधणीसाठी मदत करण्याची विनंती करण्याचे आवाहन केले. ग्राम पंचायतीसह गावकऱ्यांनाही त्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर फुलझेले यांनी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनाही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना ही बिकट समस्या लक्षात आली. त्यांनी लगेच सर्व्हे केला आणि कामाला सुरुवात झाली. अवघ्या महिनाभरात गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला. (प्रतिनिधी)