नागपूर: दिव्यांग क्रिकेटपटूंच्या टी- २० लीगमध्ये कपिल संघ विजेता ठरला. स्पर्धेत १२ संघांचा समावेश होता. मानकापूर क्रीडा संकुल परिसर तसेच कोराडी मार्गावरील तायवाडे कॉलेज मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॅम्प कम्युनिकेशन्सने गोरा इलेव्हनचा नऊ गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेत अंडर १६, अंडर १९ आणि रणजी खेळाडूंचा समावेश होता.
पोलीस उपायुक्त विवेक मसाळ, आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत, मनपा प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, सीए रोशन होरे, पुरुषोत्तम पिसे, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष उत्तम मिश्रा, विठोबा कोटांगळे, एनआयटीचे अधिकारी विजय पाटील, धनंजय उपासनी ,संजय करवाडे, सचिन ठोंबरे, अशोक काटेकर, विनय यादव, जनक साहू, अंजेश तिवारी आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण आणि स्पर्धेचा समारोप झाला. अंतिम सामन्यातील सामनावीर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू तसेच उत्कृष्ट गोलंदाज हे तिन्ही पुरस्कार आकाश गौतेल याने जिंकले. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार सुगत लाडे याला देण्यात आला.अनिल कोटांगळे आणि सचिन कनोजिया यांच्या प्रयत्नांमुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कॅप्शन....
विजेत्या रॅम्प कम्युनिकेशन्स संघाला चषक देताना पोलीस उपायुक्त विवेक मसाळ आणि इतर पाहुणे.