शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

१५ दिवसात समितीचा निर्णय : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:02 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.हैदराबाद हाऊस नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी तसेच आमदार बच्चू कडू व विभागीय आयुक्त अश्विन मुद्गल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच महसूल व जलसंपदा विभागांच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पातील बाधित गावांपैकी काही गावांचे पुनर्वसन झाले आहे व काही गावांचे अद्याप बाकी आहे. अशा गावांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. ज्या गावात नागरी सुविधा बंद आहेत. अशा गावात नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच विजेचे प्रश्न सोडविणे यासंदर्भातही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

आ. बच्चू कडूंसह एक हजार आंदोलकांवर गुन्हे  दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू तसेच भंडारा येथील बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, अरुण हटवार, राजेंद्र वाघ, मंगेश वंजारी, रमेश कारेमोरे, भाऊ कातोरे, रूपेश कातोरे, रूपेश आतिलकर आणि सुमारे एक हजार आंदोलकांवर शनिवारी सीताबर्डी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आ. कडू आणि आंदोलकांवर  बेकायदा जमाव जमवून आमदार निवासातील अन्य रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पाण्याच्या टँक खाली फेकणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा आरोप लावला आहे. त्यानुसार, या सर्वांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४२७ भादंवि तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प