शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवार घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:37 IST

कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची शनिवार १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.

ठळक मुद्दे१०२ पैकी केवळ ३८ खासगी रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची शनिवार १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.खासगी रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या काय समस्या आहेत आणि रुग्णांना होणाऱ्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. या समितीत महापौर, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आयएमएचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्धड यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौर कक्षात पार पडली. बैठकीला महापौर संदीप जोशी, विभागीय अयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुधाकर तेलंग, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. अनिल लद्दड उपस्थित होते. सदर बैठकीत उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचे नेमके कार्य काय, याबाबत चर्चा करण्यात आली.ही समिती उर्वरित रुग्णालयांच्या समस्या काय यासंदर्भात अभ्यास करून त्याचा अहवाल न्यायालयापुढे सादर करणार आहे. त्याच अनुषंगाने खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी समिती शनिवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत सुनावणी घेणार आहे. यानंतर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि स्वयंसेवी संस्थांनाही समस्या ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेतानाच त्यांनी लवकरात लवकर कोव्हिड रुग्णांसाठी मनपाला बेड्स उपलब्ध करून द्यावेत, यासंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.समितीचे कामकाज योग्य पद्धतीने व्हावे, समिती आणि खासगी रुग्णालय प्रशासनामध्ये योग्य समन्वय साधला जावा, यासाठी समितीचे सचिव म्हणून उपायुक्त मिलिंद मेश्राम यांची नेमणूक सदर बैठकीत करण्यात आली. बैठकीला उपायुक्त मिलिंद मेश्राम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल