शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘कमिशन मोह’वर चौकशी समिती

By admin | Updated: October 9, 2015 03:01 IST

गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही डॉक्टर गरीब रुग्णांना विशिष्ट खासगी पॅथालॉजी लॅबमधूनच ...

मेडिकल : दोषी डॉक्टरांचे धाबे दणाणलेनागपूर : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही डॉक्टर गरीब रुग्णांना विशिष्ट खासगी पॅथालॉजी लॅबमधूनच चाचणी करण्याची गळ घालत २५ ते ५० टक्के कमिशन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या वृत्तामुळे रुग्णालय प्रशासनच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयही (डीएमईआर) हादरले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी, दोषी डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तीनही लॅब मिळून ६० वर डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. शासनाचा यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. नुकतेच बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या सोयीसाठी ‘सेंट्रल पॅथालॉजी लॅब’ (क्लिनीकल पॅथालॉजी ओपीडी) सुरू करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणाऱ्या या लॅबमध्ये तीनही विषयाच्या नमुन्यांची एकाच ठिकाणी चाचणी होते, तर दुपारी २ वाजतानंतर नमुने ‘इमर्जन्सी लॅब’मध्ये पाठविले जातात. ही लॅब २४ ही तास सुरू असते. असे असतानाही काही डॉक्टर कमिशनचा हव्यासापोटी गरीब रुग्णाना रक्त, मलमूत्र व इतर तपासण्यांसाठी मेडिकल चौकातील एका विशिष्ट खासगी पॅथालॉजीत पाठवतात. विशेष म्हणजे, या पॅथॉलॉजीचा मालक मेडिकलच्या भरवशावर गब्बर बनला आहे. एका पाहणीत मेडिकलचा अपघात विभाग आणि विशिष्ट वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांच्या सर्वाधिक चाचण्या बाहेरून केल्या जात असल्याचे सामोर आले आहे. दिवसभरात शंभरवर तरी चाचण्या या लॅबमध्ये होत असल्याची व यातून संबंधित डॉक्टरांना २५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमिशन मिळत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये ज्या चाचण्या होतात त्यासाठीही रुग्णांना खासगीचा रस्ता दाखविला जात असल्याने गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने ‘मेडिकलचे डॉक्टर कमिशनच्या मोहात’ या मथळ्याखाली मांडली. याची दखल अधिष्ठाता निसवाडे यांनी घेऊन सात सदस्यीय चमूंची चौकशी समिती स्थापन केली. या समितीला सात दिवसांत आपला अहवाल सादर करायचा आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘डीएमईआर’कडूनही या वृत्ताची चौकशी करण्याच्या सूचना आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)