शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यकारी ४७ मतदान केंद्राना आयोगाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:47 IST

लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन ४७ साहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन ४७ साहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. 

साहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या मतदान केंद्रांमध्ये नागपूर लोकसभा मतदार संघाचे २८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदारसंघातील साहाय्यकारी मतदान केंद्रामध्ये ११८-अ सुभाषनगर, १२१-अ सुभाषनगर, १७०-अ खामला, १७४-अ स्वावलंबीनगर, २०१-अ जयताळा, ३१९-अ जोगीनगर यांचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात साहाय्यकारी मतदान संघामध्ये १६९-अ मानेवाडा, २६२-अ दिघोरी, २६७-अ दिघोरी, २९०-अ म्हाळगीनगर, ३४४-अ मानेवाडा यांचा समावेश करण्यात आला आहे.पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात ६७-अ पारडी, १०४-अ पुनापूर हे दोन मतदान केंद्र साहाय्यकारी आहेत तसेच पश्चिम विधानसभा मतदार संघात १९५-अ मतदान केंद्र गड्डीगोदाम हे साहाय्यकारी मंजूर करण्यात आले आहे.उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात १४ साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये मतदान केंद्राच्या यादीतील क्रमांक ५-अ नारा,६-अ नारा, २७-अ नारी, ३७-अ नारी, ४०-अ नारी, ७०-अ नागसेननगर, १४६-अ नारी, १५४-अ चॉक्स कॉलनी, १५९-अ सिद्धार्थ नगर, १६१-अ सिद्धार्थ नगर, १७८-अ राणी दुर्गावतीनगर, १८४-अ यशोधरानगर, १८६-अ यशोधरानगर व २४८-अ यशोधरानगर यांचा समावेश आहे.रामटेक लोकसभा मतदार संघात १९ साहाय्यकारी मतदान केंद्ररामटेक लोकसभा मतदार संघात १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर १९ साहाय्यकारी मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये सावनेर विधानसभा मतदार संघात तीन मतदान केंद्र असून यामध्ये १०९-अ गुजरखेडी, २७३-अ, चिचोरी(खापरखेडा), ३२१-अ कळमेश्वर या केंद्रांचा समावेश आहे.हिंगणा विधानसभा मतदार संघात तीन साहाय्यकारी मतदान केंद्र असून यामध्ये ५१-अ गोधनी रेल्वे, २४१-अ वानाडोंगरी व २८०-अ इसासनी यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदान संघात २२७-अ उमरेड. कामठी विधानसभा मतदार संघात १२ साहाय्यकारी मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये ६२-अ कामठी शहर, १०८-अ कामठी शहर, १३७-अ कामठी शहर, १४०-अ कामठी शहर, ३२२-अ मारोडी, ३६४-अ पिपळा, ३६५-अ पिपळा, ३६२-अ बेसा, ३७५-अ बेलतरोडी, ३७६-अ बेलतरोडी, ३७७-अ बेलतरोडी व ४०८-अ हुडकेश्वर खुर्द या साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे.

लोकशाहीला मजबूत करा, मतदान करा- जिल्हाधिकारी           मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आणि कर्तव्यसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकानेच मतदान जबाबदारीने करायला हवे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडा. मतदान निर्विघ्न व निर्भय व्हावे यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. मतदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता व कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. शत:प्रतिशत मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करावे.  अश्विन मुदगलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी,  नागपूर 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019