शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बांधकाम करणाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: August 12, 2016 02:35 IST

महापालिका कार्यक्षेत्रातील नवीन घराचे बांधकाम करण्याला अनुमती,नकाशाला मंजुरी व नियमितीकरणासह विविध स्वरूपाच्या

नगररचना विभागाचा शुल्कवाढीचा प्रस्ताव फेटाळला नागपूर : महापालिका कार्यक्षेत्रातील नवीन घराचे बांधकाम करण्याला अनुमती,नकाशाला मंजुरी व नियमितीकरणासह विविध स्वरूपाच्या शुल्कात नगररचना विभागाने वर्षभरापूर्वी वाढ केली आहे. तसेच यावर्षीच्या रेडिरेकनरच्या दरात वाढ झालेली नाही. याचा विचार न करता नगररचना विभागाने सादर केलेला शुल्कवाढीचा प्रस्ताव गुुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला. यामुळे नवीन घराचे बांधकाम करणारांना दिलासा मिळाला आहे. नगररचना विभागाने १५ जुलै २०१५ रोजी मालमत्ता संदर्भातील शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. अद्याप याला तीन वर्षांचा कालावधी झालेला नाही. बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण आहे. सध्या रेडिरेकनरच्या आधारे नकाशा मंजुरीसाठी शुल्क आकारले जाते. यात पुन्हा वाढ केल्यास घरांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नगररचना विभागाचा शुल्कवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी सांगितले. भरभक्कम शुल्कवाढ टळली ले-आऊ ट नकाशा नोंदणी शुल्क २०० रुपयावरुन २ हजार रुपये, चौकशी शुल्क इमारत नकाशात दर्शविलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी प्रति चौरस मीटर १० रुपये, विलंब शुल्क १०० रुपये प्रतिमाह वरून ५०० रुपये करण्याचे प्रस्तावित होते. परंतु प्रस्ताव फेटाळल्याने भरभक्कम शुल्कवाढ टळली आहे. शुल्कवाढीवर स्थायी समितीची नाराजी नागपूर : बांधकाम,विकास परवाना व नकाशाच्या मंजुरीसाठी महापालिका विविध प्रकारचे शुल्क आकारते. २३ सप्टेंबर २०१५ रोजी स्थायी समितीने शुल्कवाढीच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता त्यात पुन्हा शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने सादर केला होता. यावर स्थायी समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यात अनामत रकमेत (इमारत बांधकाम व परवानगी)शुल्क प्राकलन रकमेत एक टक्का वाढ प्रस्तावित होती. तसेच इमारत बांधकाम साहित्याच्या शुल्कात ०.५ टक्के,वृक्षारोपण व संवर्धन प्रति झाड ५०० रुपये, एफएसआयच्या व्यतिरिक्त जिना, बाल्कनी, लिफ्ट भिंत आदी शुल्क १८० चौरस मीटर ते ५०० मीटर चौरसपेक्षा अधिक क्षेत्रासाठी वार्षिक मुद्रांक शुल्क ४ ते १० टक्के आहे ते ५ ते १५ टक्के करण्याचे प्रस्तावित होते. यामुळे बांधकामाच्या किमतीत वाढ होणार होती. (प्रतिनिधी)