शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’

By admin | Updated: September 22, 2015 04:32 IST

यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता

नागपूर : यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता भगवान श्री गणेश बुद्धीची देवता आहे. मोठ्या उत्साहाने बुद्धीच्या या देवतेची विधिपूर्वक पूजा केली जाते. नैवेद्य, आरती आणि पुष्पहार घालून प्रसाद अर्पण केला जातो. गणेशाला प्रसन्न करून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भक्त गणेशाची उपासना, आराधना करतात. गणेशाची आपल्यावर कृपा कायम राहावी म्हणून कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपला बाप्पा उत्सवात ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नैवेद्य, हार, पूजा यांचे अनोखे मिश्रण असणार आहे. संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलर्स वाहिनीवर कौटुंबिक आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी मालिका ‘बालिका वधू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेला सर्वाधिक लांब मालिका असण्याचा सन्मान लाभला आहे. सध्या ही मालिका दोन हजाराव्या भागाकडे जात आहे. आपल्या समाजात होणाऱ्या बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. लहान मुलीपासून सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी लढवय्यी आनंदीचा जीवनप्रवास आणि अन्य सामाजिक घटनाक्रमाच्या कारणाने ही मालिका प्रत्येक भागात प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करते आहे.आनंदीची अपहरण करण्यात आलेली मुलगी तिला कशी मिळेल? ती आनंदीला आपली आई म्हणून स्वीकारेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन हजाराव्या भागात मिळणार आहेत. हा समारंभ मंगळवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता गीता मंदिर, कॉटन मार्केट, सुभाष रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील मालिका ‘बालिका वधू’वर आधारित काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सखीला पुरस्कारही देण्यात येणार आहे. याशिवाय वन मिनिट गेम शो ‘होम मिनिस्टर’ होईल. ‘देऊ या तिला मान’ विषयावर भाषण स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)या कार्यक्रमात सहभागी सर्व सखींना पूजेची थाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासोबतच एका भाग्यशाली सखीला पैठणी भेट म्हणून देण्यात येईल. आपला बाप्पा मोदक स्पर्धेत विविध रेसिपीसह मोदक घरून तयार करून आणायचे आहेत. आपला बाप्पा पुष्पहार स्पर्धेसाठी लागणारे साहित्य घरूनच घेऊन यावे लागेल. निर्धारित वेळेत पुष्पहार तयार करणे बंधनकारक आहे. आपला बाप्पा गणेश रेखाटन स्पर्धेत लागणाऱ्या सर्व साहित्याचा उपयोग करावा लागेल. जसे, फूल, बिल्वपत्र, पान, सुपारी, रांगोळी आदी.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सखी कार्यक्रम स्थळीही नोंदणी करू शकणार आहेत.सखींना मिळणार पैठणी जिंकण्याची संधीसमारोहात ‘वन मिनिट गेम शो’मध्ये ‘होम मिनिस्टर’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सखींना भरपूर पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘होम मिनिस्टर’च्या पुरस्कारांमध्ये पैठणीचे विशेष आकर्षण राहणार आहे. या स्पर्धेतील प्रश्नोत्तरे मजेदार राहणार आहेत. या प्रश्नांची सर्वाधिक योग्य उत्तरे देणाऱ्या सखीला ही पैठणी मिळणार आहे.