शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीसाठी मंत्र्यांसमोर रंगली राजकीय नुराकुस्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:09 IST

कामठी : कामठी येथील कोविड परिस्थिती आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेतील बैठक वादळी ठरली. ...

कामठी : कामठी येथील कोविड परिस्थिती आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेतील बैठक वादळी ठरली. बैठकस्थळी शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) बसण्याची (खुर्ची) व्यवस्था नसल्याचे सांगत भाजपचे आ. टेकचंद सावरकर यांनी आक्षेप घेतला. यासोबतच येथे बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचे सांगत सावरकर आक्रमक झाले. सावरकर यांनी ही बैठक काँग्रेसचा मेळावा असल्याचे सांगत बहिष्काराची भूमिका मांडली. तिथे उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सावरकर यांना बसण्यास सांगितले असता, या दोघांत शाब्दिक चकमक उडाली. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समोर झालेल्या या वादाचा व्हायरल झालेला व्हिडिओ जिल्ह्यात सोमवारी चर्चेचा विषय ठरला.

कामठी मतदार संघात काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा प्रकार नवा नाही. भोयर काँग्रेसकडून विधानसभेचे उमेदवार झाल्यानंतर विविध विषयांवर येथे काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांत खटके उडाले आहेत. गतवर्षी मौदा येथील बैठकीत सावरकर आणि मंत्री केदार यांच्यात याच मुद्द्यावर वादही झाला होता, हे विशेष.

कामठी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री केदार यांच्या अध्यक्षतेत राज रॉयल लॉन येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आ. सावरकर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, ते या बैठकीला काहीवेळ उशिरा पोहोचले. तिथे उपस्थित तहसीलदार हिंगे यांच्याकडून त्यांनी स्वागतही नाकारले. सदर बैठक शासकीय विभागाची आहे की काँग्रेसचा मेळावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच येथे कोणत्याही शासकीय व संवैधानिक पदावर नसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बसविण्यात आले. सोबतच लोकप्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था प्रोटोकॉलनुसार नसल्याची भूमिका मांडली. ते बैठकस्थळी शेवटी बसले. काही वेळानंतर त्यांनी मंत्री केदार यांना आपल्यालाही बोलायचे आहे, असे सांगितले. यावरही केदार आणि त्यांच्यात मोठ्या आवाजात चर्चा झाली. यावर उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आवाज चढविण्यात आल्यावर काँग्रेसचा निषेध नोंदवत सावरकर येथून बाहेर पडले. दरम्यान, मंत्री केदार यांनी झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करीत लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्याची भूमिका याप्रसंगी मांडली.

- कामठी येथील विकास आढावा बैठक शासकीय होती? की काँग्रेसचा मेळावा. शासकीय बैठक होती? तर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था स्टेजवर का होती? ज्या बैठकीत आमदारांना बोलण्याची संधी नाही आणि शासकीय प्रोटोकॉल पाळले जात नसेल तर अशा बैठकांचा निषेध केलेला बरा.

-टेकचंद सावरकर, आमदार, कामठी

--

कामठी मतदार संघातील विकासकामांच्या मुद्द्यावर आ. सावरकर नेहमीच आडकाठी घालतात. गतवर्षी मौदा येथील बैठकीतही त्यांनी असाच प्रकार केला होता. आजही ते बैठकीला उशिरा आले. बैठकीत मंत्र्यांचा अपमान होत असेल तर आम्ही गप्प बसायचे का?

सुरेश भोयर, माजी जि.प. अध्यक्ष, नागपूर