शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाचे पर्याय बदलता येणार नाहीत; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:11 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी नोंदवलेले महाविद्यालयांचे पर्याय अहस्तक्षेपीय असतात. एकदा पर्याय नोंदवल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला व यासंदर्भातील रिट याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देविद्यार्थिनीची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी नोंदवलेले महाविद्यालयांचे पर्याय अहस्तक्षेपीय असतात. एकदा पर्याय नोंदवल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला व यासंदर्भातील रिट याचिका फेटाळून लावली. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थिनी मंजिरी कोल्हे हिने ही याचिका दाखल केली होती. तिने नीट परीक्षा दिली असून तिची अखिल भारतीय रँक २५ हजार ९६८ आहे. तिला एम.बी.बी.एस. अभ्यासक्र मात प्रवेश घ्यायचा आहे. परंतु तिने प्रवेश अर्ज भरताना महाविद्यालयाच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाऐवजी चुकून नवी मुंबईतील तेरना दंत महाविद्यालयाचा संकेतांक नोंदवला. प्रवेशाकरिता तेरना दंत महाविद्यालय वाटप झाल्यानंतर तिला स्वत:ची चूक कळली. त्यामुळे तिने पर्यायात सुधारणा करण्यासाठी राज्य सीईटी सेलकडे अर्ज सादर केला होता. परंतु, तिला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाविद्यालयाचा पर्याय नोंदवताना तांत्रिक चूक झाली. एम.बी.बी.एस. अभ्यासक्र मात प्रवेश घ्यायचा असल्यामुळे पर्यायात सुधारणा करण्याची अनुमती देण्यात यावी असे तिचे म्हणणे होते. सीईटी सेलने माहिती पुस्तिकेतील नियम १०.७ व २०१६ मधील प्रवेश नियमानुसार पर्यायात बदल करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता याचिका खारीज केली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. अनिल ढवस तर, सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. नहुश खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय