शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

बंधनातून मुक्तीसाठी स्त्रीशक्तीचे सामूहिक बंड

By admin | Updated: March 11, 2017 02:51 IST

सावित्रीआई, जोतिबांनी भारतातील ज्या मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या झटक्यात तोडून दिल्या

सावित्रीआईला मानाचे अभिवादन : देशभरातील हजारो महिलांचा स्वातंत्र्यासाठी एल्गार नागपूर : सावित्रीआई, जोतिबांनी भारतातील ज्या मुलींसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या झटक्यात तोडून दिल्या त्या मुलींनी आज प्रगतीचे मुक्त आकाश गाठले आहे. मात्र आता गुलामीच्या बेड्या पुन्हा या मुलींना बांधू पाहत आहेत. कधी धर्माच्या नावाने, पुरुषत्वाच्या मानसिकतेने, समाजाच्या भीतीने आणि आता सुरक्षेची आपुलकी दाखवून वसतिगृहाच्या चार भिंतीआड डांबले जात आहे. सावित्रीने दिलेले मुक्त आकाश हिसकावू पाहत आहे. परंतु आता नाही. मनुवादी शक्तींच्या विरोधात आता बंड करावेच लागेल. ‘हमे चाहिए आझादी...’ म्हणत देशभरातील महिला शक्तीने गुरुवारी नागपूरच्या इंदोरा मैदानातून बंधनमुक्तीचा एल्गार पुकारला. विद्याज्योती व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या १२० व्या पुण्यतिथीनिमित्त शेड्यूलकास्ट फेडरेशनच्या बॅनरखाली ७५ व्या राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. ही परिषद अनेक अंगाने ऐतिहासिक ठरली. बौद्ध, दलित, मुस्लिम, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, धार्मिक व वांशिक अल्पसंख्यक महिला, भटक्या जमातीतील महिला, लैंगिक कामगार, समलैंगिक, असंघटित क्षेत्रातील महिला अशा सर्वच समाज घटकातील महिला प्रतिनिधी, कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत समाजाच्या विविध घटकांमध्ये सेवेचे, जागृतीचे काम करणाऱ्या शेकडो महिला कार्यकर्त्या, नेत्या परिषदेला उपस्थित होत्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालविताना देशात निर्माण झालेल्या असहिष्णुतेमुळे दुखावलेल्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. रोहित वेमुलाच्या हैदराबाद विद्यालयातील विद्यार्थ्यांसह ‘पिंजरा तोड’ आंदोलनातून देशभरातील मुलींना जागविणाऱ्या दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी, जेएनयू, पुणे, बेंगलोर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ग्रुप परिषदेला सहभागी झाले होते. दिल्ली, गुजरात, पंजाब, हरियाणा, मुंबई, पुणे, आंध्र प्रदेश, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातील जवळपास ५००० महिलांनी परिषदेला हजेरी लावली. हैदराबादच्या रोहित वेमुलाच्या मृत्यूने शिक्षणाच्या क्षेत्रात पसरलेल्या मनुवादाचा चेहरा समोर आला. गुजरातच्या उनामध्ये गोमांसच्या कारणावरून दलित तरुणांना झालेली सार्वजनिक मारहाण, मुजफ्फरपूर दंगे, अकलाखचे प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबर्गी यांची हत्या, जेएनयूचा मुद्दा आणि नुकतेच वसतिगृहातील मुलींना सुरक्षेच्या कारणावरून बंधन घालण्याचा प्रकार अशा विविध घटनांचे पडसाद परिषदेत उमटले. देशात वाढणारी असहिष्णुता, विषमता, धार्मिक कट्टरवाद याबद्दलचा रोष परिषदेत उमटला. मनुवादाच्या बुरख्यात असलेला धार्मिक कट्टरवाद, द्वेष, लिंगभेद याविरोधात ‘चलो नागपूर’चा नारा देत या शक्तींविरोधात संघटितपणे लढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. देशभरातून आलेल्या विद्यार्थिनी, महिला, कार्यकर्त्यांनी गीत, संगीत, नृत्य, कला, कविता, नाटकांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून न्याय, मैत्री, शांतता, स्वातंत्र्य, समानता, आत्मसन्मान प्रस्थापित करण्याचा आवाज उठविला. आम्ही मुक्त आहोत, आम्हाला कुणी बंधन घालू नका. आम्हालाही माणूस म्हणून समानतेने जगू द्या. वाढती असमानता, असहिष्णुतेला व आवाज दडपण्याच्या प्रयत्नांना आव्हान देण्याचे बंड परिषदेतून केले आहे. प्रा. अभिनया कांबळे, अजिता राव, अनिता घई, बिट्टू कार्तिक कोण्डय्या, छाया खोब्रागडे, दुर्गा झा, इलिना होरो, हसिना खान, जया शर्मा, किरण देशमुख, लता प्रमा, मुजफ्फरपूर क्षेत्रात काम करणाऱ्या माधवी कुकरेजा, आंध्रप्रदेशच्या कार्यकर्त्या डॉ. मनिषा बांगर, गुजरातमध्ये आंबेडकरी विचारांचा प्रसार करणाऱ्या मंजुला प्रदीप, मारिया सलीम, मीना सेशु, मनिषा बहल, निवेदिता मेनन, निशा शेंडे, रजनी तिलक, रितूपर्णा बोरा, संगीता महाजन, शबनम हाशमी, शबिना मुमताज, शंभवी विक्रम, श्यामल गरुड, अ‍ॅड. स्मिता कांबळे, सरोज आगलावे, कुमुद पावडे, तक्षशिला वाघधरे, रुबिना पटेल, शोमा सेन, तृतीय पंथीय अर्चना, सेक्सवर्करच्या हक्कासाठी काम करणाऱ्या प्रतिनिधी, जेएनयू, हैदराबाद, दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)