शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत १८ परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:20 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला १८ परीक्षा केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी झाल्याचा ऑनलाईन अहवाल सादर झाला आहे.

ठळक मुद्दे शिक्षण मंडळाला ऑनलाईन रिपोर्ट सादर

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मथळा वाचून आपण चकित झाला असाल. परंतु, हे सत्य आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला १८ परीक्षा केंद्रांमध्ये सामूहिक कॉपी झाल्याचा ऑनलाईन अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे विभागीय कार्यालयात खळबळ माजली आहे.या अहवालाशी संबंधित दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, अहवालातील कॉपी करणाऱ्यांच्या स्तंभात परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची संख्या नमूद करण्यात आली होती. त्यामुळे ताबडतोब हालचाली करून अहवालात सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. आश्चर्य म्हणजे हा प्रकार केवळ एक-दोनदा झाला नाही. इयत्ता बारावीनंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेचेही याच पद्धतीचे अहवाल पाठविले गेले. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्तंभात परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या लिहिण्यात आली. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही चूक अनवधानाने होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, संबंधितांना सुधारित अहवाल पाठविण्याचे व यापुढे सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना परीक्षेपूर्वी प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात आॅनलाईन अहवाल कसा तयार करायचा याची माहिती देण्यात आली होती. असे असताना चुकीचे अहवाल पाठविण्यात आले.यामुळे मागितली ऑनलाईन माहितीपरीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्याचा व भरारी पथकाने प्रभावी कार्य केल्याचा दावा मंडळाच्या वतीने दरवर्षी केला जातो. परंतु, वास्तव वेगळे राहते. त्यामुळे यावर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेपूर्वी पुणे मुख्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात परीक्षा केंद्रातील व्यवस्था व भरारी पथकाच्या सक्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच, परीक्षा केंद्रातील इत्थंभूत माहिती आॅनलाईन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला व अहवालाची रचना ठरविण्यात आली.

टॅग्स :examपरीक्षा