शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळशाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

कमल शर्मा नागपूर : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल ...

कमल शर्मा

नागपूर : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो.

तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. महाजेनकोच्या सूत्रानुसार, सर्वाधिक कोळशाचा पुरवठा वेकोलिकडून होतो. परंतु मागील अनेक दिवसापासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे वीज केंद्रांमधील स्टॉक कमी होत चालला आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी कमी होत चालला आहे. आता परिस्थिती अशी आहे की रोजच्या पुरवठ्यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट इतकी होती. ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु भविष्यात संकट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

औष्णिक वीज केंद्रातील कोळशाची स्थिती

केंद्र उपलब्ध स्टॉक

खापरखेडा - ०.५ दिवस

कोराडी - २ दिवस

चंद्रपूर- १.५ दिवस

नाशिक - १.५ दिवस

पारस - १.२५ दिवस

परळी - १.७५ दिवस

भुसावळ- १ दिवस

-बंद पडले युनिट

कोळसा नसल्याने राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद पडले आहेत. यात चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ यांचा समावेश आहे. कोराडीतील एक युनिट आपात्कालीन कारणांमुळे बंद आहे. येतील एक युनिट कोळशाअभावी कधीही बंद पडू शकतो.

- एनटीपीसी, खासगी क्षेत्रही प्रभावित, गॅसचाही तुटवडा

कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी औष्णिक वीज केंद्रातील एक युनिटही ठप्प पडले आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानी तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन कमी झाले आहे. तर रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलचे दोन युनिट बंद करावे लागले. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस उपलब्ध नसल्याने बंद आहे.