शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

By admin | Updated: October 2, 2016 02:52 IST

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी : हजारो रुग्णांना ८३ कोटींची मदतनागपूर : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. २२ महिन्यांत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना थोडीथोडकी नव्हे तर ८३ कोटींहून अधिक रुपयांची मदत झाली आहे. या वर्षी एप्रिलपासून तर मदतीचे प्रमाण आणखी वाढले असून पाच महिन्यांतच ४५ कोटींहून अधिक निधीचे वाटप झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मुख्यमंत्री कार्यालयाकडे मुख्यमंत्री सहायता निधीबाबत विचारणा केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती रुग्ण होते तसेच नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या पुनर्वसनासाठी किती मदत करण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१६ या १९ महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १२ हजार ५४९ नागरिकांचे अर्ज आले. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना मदतीचे वाटप करण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१६ या काळात अर्जदारांना ८३ कोटी ६ लाख १८ हजार ३४० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तर नैसर्गिक आपत्ती बाधितांचे पुनर्वसन व अपघाती मृत्यू प्रकरणांत २२ कोटी ७६ लाख ४२ हजार ५९ रुपयांची मदत करण्यात आली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीत ३०२ कोटी ८४ लाख ५९ हजार ७९४ रुपयांचा निधी जमा होता. (प्रतिनिधी)पाच महिन्यांत ४५ कोटींचे वाटपमुख्यमंत्री साहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय सहाय्यता कक्षच स्थापन करण्यात आला आहे. सुरुवातीला येणाऱ्या अर्जांचे प्रमाण कमी होते. परंतु आता ही संख्या हजारोंवर गेली आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या ५ महिन्यांच्या कालावधीतच ४५ कोटी १८ लाख ८० हजार ५७० रुपयांची मदत करण्यात आली.कुठलाही अर्ज नाकारण्यात येत नाहीमुख्यमंत्री साहाय्यता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीबाबतचा अर्ज कधीही नाकारण्यात येत नाही, ही बाब या माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. जर कागदपत्रांत काही त्रुटी असतील तर तसे अर्जदारांना कळविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर मदत पुरविण्यात येते. वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त इतर प्रकरणांत मदत देणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार आहे, असेदेखील सचिवालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.