शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेेंटर बंद करा पण पर्यायी व्यवस्था ठेवा ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

भिवापूर : कोरोनाची संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता किमान पुढील सहा महिने तरी कोविड सेंटर सुरू राहणार ...

भिवापूर : कोरोनाची संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता किमान पुढील सहा महिने तरी कोविड सेंटर सुरू राहणार अशी अपेक्षा होती. मात्र अचानक धडकलेल्या आदेशामुळे आता कोविड सेंटरला कुलूप लागणार आहे. ते तात्पुरत्या स्वरूपात असले तरी कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याचेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे कार्यरत कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांनी आपले साहित्य गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. इकडे प्रशासनाच्यावतीने कोविड सेंटर बंद करण्याची तयारी चालू केली असली अचानक रुग्णसंख्या वाढल्यास त्यांच्या उपचारासाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

रुग्णसंख्या ओसरत असल्याचे कारण देत जिल्हा शल्य चिकित्सकांनी १७ जून रोजी जिल्ह्यात कार्यरत असलेले १४ कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद करून कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याचे आदेश दिले आहे. तिसरी लाट येताच कोविड सेंटर व कंत्राटी मनुष्यबळ तात्काळ सेवेत रुजू करण्याबाबतच्या सूचनाही त्यात दिल्या आहे. असे असले तरी कार्यरत कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची वाट बघत, आम्ही कुठवर वेतनाविना घरी बसायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे सदर आदेश येताच कार्यरत कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांनी इतरत्र नोकरीची शोधाशोध सुरू केली आहे. यात स्थानिक दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तर मुंबई व गडचिरोली येथील खाजगी रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज केल्याचे समजते. त्यासाठी त्यांना अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या या डॉक्टर व परिचारिकांनी आरोग्य विभागाकडून अनुभव प्रमाणपत्र सुद्धा घेतले आहे. १ जुलैपासून कोविड सेंटर बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे सर्व कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त होणार आहे.

पुन्हा परतण्याची आशा धूसर

तालुक्यातील कोविड सेंटरमधून कर्तव्यमुक्त होताच हे सर्व कंत्राटी कर्मचारी मिळेल त्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. नोकरी मिळताच ते रुजूही होणार आहे. एकदा का ते नव्या ठिकाणी रुजू झाले की, पुन्हा तालुकास्थळी परतण्याची आशा धूसर आहे. अशात तिसरी लाट आल्यास कोविड केअर सेंटरसाठी कर्मचारी मिळविण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहे.

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संभावित तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. अशात कोविड सेंटर, पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा सज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे भिवापूर, उमरेड, कुहीसह जिल्हाभरातील कुठलेही कोविड सेंटर बंद करू नये, कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणी माजी आ. सुधीर पारवे यांनी केली. याबाबत त्यांनी पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले आहे.