शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:13 IST

स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली.

ठळक मुद्देसहा महिन्यात ३४.३३ कोटींचे बिल : कंपनीने केली ७.३३ कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली. असे असतानाही शहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडचे घर भरण्याचा प्रकार सुरूच आहे. कचरा संकलनासाठी कंपनीला २७ कोटींची रक्कम देण्याचे ठरले असताना कंपनीने वित्त वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यासाठी ३४ .३३ कोटींचे बिल महापालिकेला दिले आहे. महापालिकेने या रकमेसह वाढीव ७.३३ कोटींची अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी चालविली आहे. गुरुवारी होणाºया महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.बिलाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ झाल्याने शहरात कचरा होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित के ला जातो. हा कचरा उचलून भांडेवाडी येथे नेण्याचा खर्च कनकला दिला जातो तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. सध्या २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाते.कचरामुक्त शहराची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून महापालिकेने २४ डिसेंबर २००७ रोजी स्थायी समितीने १० वर्षांसाठी कनक रिसोर्सेसला काम दिले होते. १२ जून २०१४ रोजी वर्षाला २७ कोटींच्या आधारावर पाच वर्र्षांसाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु कचरा संकलनाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बिलातील घोळाची चौकशीकनक रिसोर्सेस मॅनेजमेंटवर कचरा संकलन व दर तसेच बिलात घोळ केल्याचा आरोप आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कचरा संकलनाच्या दरात वाढ करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने महापालिकेतील अधिकाºयांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. याची चौकशी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कचरा संकलनाचे वाढीव बिल ही एक मोठी समस्या मानली जात आहे.कचरागाड्या येत नाहीकचरा संकलनासाठी कनकच्या गाड्या घरोघरी जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कंपनीकडे १००४ वाहने आहेत. शहरातील मध्य भागात कचरा घराघरातून संकलित केला जातो. इतर भागातील परिस्थिती वेगळी आहे. अनेक वस्त्यात दिवसभर कचरा रस्त्यांवर पडून असतो. परंतु कपंनी कचरा उचलत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.