शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकाल ; ‘इंग्रजी’चा दे धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 10:33 IST

मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे८३.२२ टक्केच निकालयंदा ‘सेंट परसेंट’ची आकडेवारीही घटली

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजीचा निकाल माघारला आहे. एकूण १३० विषयांपैकी सर्वात कमी म्हणजेच ८३.२२ टक्के निकाल इंग्रजी विषयाचा लागला आहे. दरम्यान यंदा ३९ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी ५८ विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’ होता. यंदा ही आकडेवारी घटली आहे.बारावीत विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजीची सर्वाधिक भीती वाटत असते. मागील वर्षी गणिताचा निकाल ९५.५६ टक्के लागला होता. यंदा त्यात पाच टक्क्यांहून अधिक घट झाली असून ८९.४४ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय भौतिकशास्त्र (९२.७०%), जीवशास्त्र (९५.७४%) व रसायनशास्त्र (९४.१० %)या विषयांचा निकालदेखील माघारला आहे. मराठीचा निकाल ९५.१३ टक्के तर हिंदीचा निकाल ९८.०२ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दोन विषयांना प्रत्येकी एकच परीक्षार्थीयंदा १३० पैकी २७ विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. दोन विषयांमध्ये तर प्रत्येकी एकच परीक्षार्थी होता. हे दोन्ही जण उत्तीर्ण झाले आहेत. विभागात सर्वात अधिक १ लाख ६३ हजार ६०७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांची परीक्षा दिली. तर १ लाख ११ हजार ५२६ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल