शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वीज स्वयंपूर्णतेचा दावा फसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:39 IST

महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता. परंतु भाजप सरकारने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याच्या दाव्यासारखा वीज स्वयंपूर्णतेचा दावाही फसवा आहे, असा आरोप माजी मंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने भारनियमन आणि वाढीव विद्युत बिलाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, भारनियमनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना भारनियमन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांच्या अभ्यासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारनियमनामुळे उद्योजक, कारखानदार, दुकानदार, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. कोळशाअभावी भारनियमन सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी २२ आॅगस्टलाच सरकारला पत्राद्वारे कोळसा नसल्याने वीज केंद्रे अडचणीत येऊ शकतात, अशी सूचना केली होती.शासनाने याबाबत योग्य नियोजन का केले नाही, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. आंदोलनात ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, दुनेश्वर पेठे, महिला अध्यक्ष अलका कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर उपाध्यक्ष नूतन रेवतकर, राजू नागूलवार, विनोद हेडाऊ, जतीन मलकान, अर्चना हरडे, उज्वला बोढारे, वर्षा श्यामकुळे, अविनाश गोतमारे, बंडु उमरकर, नरेश अडसरे, दिनकर वानखेडे, सुखदेव वंजारी यांच्यासह शहर पदाधिकारी आणि नागपूर ग्रामीणमधून आलेले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.