अपघात वाढले : १४४ किलोमीटर लांब रस्त्यांवर नेटवर्क राजीव सिंह - नागपूरनियमित डांबरीकरण व देखभाल केली जात नसल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यातच ‘4जी’ नेटवर्क टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले जात असल्यामुळे शहरवासीयांचा त्रास वाढला आहे. सुरुवातीलाच ही अवस्था असल्यामुळे पुढे चालून हे खड्डे शहर विद्रूप करेल. १४४ किलोमीटर लांब रस्त्यांवर नेटवर्क टाकण्यात येणार आहे. मनपाने रिलायन्स कंपनीला नेटवर्क टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतु, नेटवर्कसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित भरले जात आहेत काय याकडे लक्ष देणारा कुणीच नाही. यामुळे खड्ड्यांची संख्या सतत वाढत आहे. बाजार असो वा रहिवासी कॉलनी प्रत्येक ठिकाणी मातीचे ढिगारे व खड्डे दिसून येत आहेत. काही ठिकाणी मशीनही रस्त्यावरच उभी ठेवली जाते. केबल टाकण्यासाठी १०० मीटर अंतरावर खड्डे खोदण्यात येत आहेत. मशीनच्या साहायाने केबल टाकल्यानंतर खड्डे मातीने भरले जातात. यामुळे अपघात होत आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन काम बंद करण्याची मागणी केली होती. काय आहे नियमओसीडब्ल्यू, महावितरण व अन्य विभागांना पाईपलाईन किंवा केबल टाकण्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार १०० मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम बुजवून पुढील कामाला सुरुवात करावी लागते. असे न केल्यास मनपा संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकते. दुसऱ्या पर्यांयांतर्गत मनपा स्वत: खड्डे बुजवून त्याचा खर्च कंपनीकडून वसूल करू शकते. ओसीडब्ल्यूच्या प्रकरणात असेच करण्यात आले होते. नेटवर्कसाठी वीज खांबांचा उपयोगशहरवासीयांना लवकर ‘4जी’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वीज खांबांवरून तार टाकल्या जात आहेत. सध्या ५००० विद्युत खांबांवर तार टाकल्या जाणार आहेत. यातून मनपाला प्रति खांब २५० रुपये याप्रमाणे १ कोटी ४४ लाख रुपये उपलब्ध होतील.वाहनचालक कोसळताहेतगांधीगेटकडून चिटणवीस पार्ककडे वळताना ‘4जी’ नेटवर्कसाठी खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे. यामुळे वाहनचालक कोसळून अपघात होत आहेत. हा रस्ता त्वरित पूर्ववत करण्याची गरज आहे.मनपा झटकतेय जबाबदारीयासंदर्भात संबंधित प्रकरणाचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) महेश गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ते कार्यालयातही उपस्थित नव्हते. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जयस्वाल यांनी वीज खांबांवर अस्थायी नेटवर्क टाकण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. यातून मनपाला उत्पन्न मिळत आहे. समस्येचे काहीच कारण नाही, असे ते म्हणाले.वाहतूक विस्कळीतडालडा फॅक्टरीजवळ मोठा खड्डा आहे. यातून रंगीबेरंगी पाईप निघालेले आहेत. आजूबाजूला मातीचे ढीग आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत होते. वाहनचालकांसोबत पायी चालणाऱ्यांनाही त्रास होत आहे.लक्ष्मीनगर झोनमध्ये आंदोलन‘4जी’ नेटवर्कमुळे लक्ष्मीनगर झोनमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. झोनचे सभापती गोपाल बोहरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून काम बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिलेली ६ दिवसांची मुदत संपली आहे. यामुळे बोहरे कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
‘4जी’च्या खड्ड्यांमुळे शहर विद्रूप
By admin | Updated: February 4, 2015 00:59 IST