शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

By admin | Updated: August 28, 2015 03:24 IST

लोकमतने विशेष पुढाकार घेऊन प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनातून थांबवलेली ...

प्रभाव लोकमतचानागपूर : लोकमतने विशेष पुढाकार घेऊन प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनातून थांबवलेली जीवन विमा पॉलिसीच्या मासिक हप्त्याची आणि पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज परतफेड आणि भागभांडवलाची कपात पूर्ववत बहाल केली आहे. सतत दोन महिन्यांपासून तणावात वावरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ही कपात पोलीस कर्मचाऱ्यांच्या चालू आॅगस्टच्या वेतनापासून प्रारंभ केली जात आहे. १९७२ पासून निरंतरपणे वेतन बचत योजनेंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या परस्पर वेतनातून दरमहा विम्याच्या प्रीमियमची आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज हप्त्यांची व भागभांडवलाची कपात केली जात होती. परंतु अचानक पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी १२ जून २०१५ रोजी जारी केलेल्या एका आदेशान्वये ही कपात बंद केली होती. परिणामी आधीच तणावात वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण आणखीच वाढविण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांना विम्याच्या प्रीमियमची रक्कम आणि सोसायटीच्या कर्जाचे हप्ते स्वत: भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. प्रीमियम भरण्यास विलंब झाल्याने काहींना वेगळा दंड भरावा लागत होता तर काहींची पॉलिसी प्रीमियम न भरल्याने बाद झाली होती. सूरजप्रसाद चौबे आणि संजय बघेल या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे अचानक निधन झाल्याने आणि वेतन कपात बंदीमुळे त्यांच्या विम्याच्या प्रीमियमचे हप्ते थकीत झाल्याने पॉलिसी बंद पडली होती. आताही त्यांच्या कुटुंबीयांना पॉलिसीच्या रकमेसाठी धावपळ करावी लागत आहे. (प्रतिनिधी)