राष्ट्रवादी घेणार मुलाखतीपवार, तटकरे, मुंडे येणार : ८ रोजी जिल्हानिहाय चर्चानागपूर : विदर्भातील आठ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शहर व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ही नेतेमंडळी ८ जुलै रोजी नागपुरात जिल्हानिहाय मुलाखती घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीसाठी सर्वच गटांनी जोरात मोर्चेबांधणी केली होती. यामुळे शहर व जिल्हाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक आले असता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. Þनागपुरात तर निरीक्षक म्हणून आलेले आ. राजेंद्र जैन यांनी इच्छुकांची नावे घेत अध्यक्षाची घोषणा मुंबईत नेते करतील, असे स्पष्ट केल्यानंतरही समांतर निवडणूक घेत रमण ठवकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या वादात प्रदेशच्या नेत्यांनी जिल्हाध्यक्षांची घोषणा केलीच नाही. सर्वांचेच म्हणणे ऐकणारशहर व जिल्हाध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी घेणार मुलाखतीनागपूर : काही दिवसांपूर्वी विदर्भातील भंडारा, गोंदिया व बुलडाणा या तीन जिल्हाध्यक्षांची नावे मुंबईहून जाहीर करण्यात आली होती. उर्वरित आठ जिल्ह्यांची घोषणा अद्याप व्हायची आहे. आता पवार, तटकरे व मुंडे हे संबंधित आठही जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यासाठी ८ जुलै रोजी नागपुरातील रविभवनात जिल्हानिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत; शिवाय सर्वच गटांचे म्हणणेही ऐकून घेणार आहेत.
शहर व जिल्हाध्यक्ष निवडीसाठी
By admin | Updated: July 7, 2015 02:13 IST