शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोळशासह ध्वनी प्रदूषणाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: September 7, 2014 00:48 IST

वणी तालुक्यासह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात कोळसा प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी मात्र शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होताना

देशात दुसरा क्रमांक : प्रदूषणाकडे सर्वांचेच दुर्लक्षरवींद्र चांदेकर - वणीवणी तालुक्यासह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात कोळसा प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी मात्र शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. परिणामी सध्या वणी हे राज्यातीलच नव्हे, तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नावारूपास आले आहे.वणी परिसरात नायगाव, उकणी, बेलोरा, निलजई खाण क्रमांक एक व दोन, घोन्सा, कुंभारखणी, मुंगोली, जुनाड, कोलारपिंपरी, पिंपळगाव, भांदेवाडा अशा जवळपास १५ भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून रोज हजारो टन कोळसा बाहेर काढला जातो. याच खाणींनी प्रदूषणात भर टाकल्याने वणी परिसर प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कोळसा खाणींसह कोलवॉशरी व कोळशावर आधारित इतर लघु उद्योगही येथे आहेत. कोळसा वाहतुकीमुळे परिसरात वाहतूकही वाढली आहे. कोळसा खाण ते कोल डेपोपर्यंत विविध वाहनांतून कोळसा वाहून नेला जातो. कोळसा वाहून नेताना संबंधित वाहनांवर ‘टारपोलिन’ झाकण्याचे बंधन आहे. मात्र ते झुगारून कोळसा वाहतूक केली जाते. कोळसा वाहून नेताना त्याचे ‘ढेले’ रस्त्याच्या आजूबाजूला पडतात. त्यावरून इतर वाहने गेल्याने त्याची भुकटी होते. ती हवेत मिसळते. त्याचे अगदी बारीक कण होतात. ते डोळ्यांनाही दिसत नाही. ही धूळ रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर जाऊन बसते. त्यामुळे या पिकांवर अक्षरश: धुळीचे थर दिसून येतात. परिणामी उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोळशाची ही धूळ शहरात पसरते. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करते. करते. या ‘कोल डस्ट’मुळे त्वचा रोग, दमा, श्वसनाचे रोग, अ‍ॅलर्जी आदी रोग या परिसरात वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी देशातील प्रदूषित शहरांमध्ये लगतच्या चंद्रपूरचा चौथा क्रमांक होता. आता तो दुसरा झाला. चंद्रपूरवरून वणीचे अंतर केवळ ५५ किलोमीटर आहे. म्हणूनच वणी परिसर आता देशात दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित परिसर झाला आहे. या प्रदूषणामुळे नवजात चिमुरड्यांना जन्मताच आजारांची देणगी मिळत आहे. या विषारी धुळीने जनतेला कर्करोग, दमा, किडणी, हृदयरोग आदी आजारांची लागण होत आहे.ज्याप्रमाणे वायू व जल प्रदूषण मानवी आरोग्यास धोकादायक आहे, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणही मानवाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते. कानाचे पडदे काही मर्यादेपर्यंतच आवाज सहन करू शकतात़ त्यामुळे मानवी आरोग्याचे हीत लक्षात घेऊन शासनाने ध्वनी प्रदूषण (नियम नियंत्रण) अधिनियम-२००० तयार केला़ या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर अधिक आहे़ मात्र अंमलबजावणी करण्यास सर्वच हतबल ठरत आहे़ विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न, मिरवणुका, विजयोत्सव यामध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे़ ध्वनी प्रदूषण कायदा मोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे़ भर चौकात, शहरातील रस्त्यांवर निघणाऱ्या मिरवणुका, विजयोत्सव, जयंती, सण-उत्सव यावेळी कानाच्या ठिकळ्या उडविणारे आवाज सुरू असतात़ जवळपासच्या परिसरात एकमेकांना संवाद साधणे कठीण होऊन जाते़