शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटा बदलवण्यासाठी नागरिकांची अजूनही भटकंती

By admin | Updated: March 21, 2017 01:51 IST

जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत डिसेंबरमध्येच संपली. परंतु कळत नकळत अजूनही अनेकांकडे थोड्या फार जुन्या नोटा शिल्लक आहेत.

रिझर्व्ह बँकेत गर्दी : अधिकारीही त्रस्त नागपूर : जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत डिसेंबरमध्येच संपली. परंतु कळत नकळत अजूनही अनेकांकडे थोड्या फार जुन्या नोटा शिल्लक आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांची भटकंती अजूनही सुरूच आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेतही लोक गर्दी करीत आहेत. परंतु जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत संपली असून दरम्यानच्या काळात जे लोक विदेशात होते, किंवा आहेत त्यांच्याजवळच्याच जुन्या नोटा मार्च अखेरपर्यंत बदलवून दिल्या जात असल्याची बाब लक्षात येताच लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.सोमवारी असाच प्रकार घडला. रिझर्व्ह बँकेत ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलवून मिळतील, या माहितीच्या आधारावर नागरिकांनी रिझर्व्ह बँकेत गर्दी केली. काही जण तर बाहेरगावावरूनही आले होते. बराच वेळ रिझर्व्ह बँकेसमोर ही मंडळी उभी राहिली. परंतु त्यांना आत सोडले जात नव्हते. एका व्यक्तीला आत सोडण्यात आले. त्याला सविस्तर माहिती देण्यात आली परंतु नागरिकांचे समाधान झाले नाही. नागरिक गेटसमोर ठाण मांडून बसले होते. अखेर रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक एस.एस. रावत हे स्वत: गेटबाहेर आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांची समजूत काढली. जुन्या नोटा बदलविण्याची मुदत संपली असून आता केवळ एनआरआयसाठीच ही सवलत असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. यानंतर नागरिक आपापल्या घरी परत गेले. (प्रतिनिधी)