शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चक्क ‘ड्रोन’, विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:10 IST

नागपूर : हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे ...

नागपूर : हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. सर्वसाधारणत: हवाईमार्गाने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त प्रमाणात बेकादेशीरपणे आणल्या जातात असा समज आहे. परंतु मागील पाच वर्षांत शहरात या वस्तूंसह चक्क ‘ड्रोन’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चादेखील प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे विचारणा केली होती. मार्च २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत कार्यालयाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ने अनधिकृतपणे आणण्याचा प्रयत्न येणाऱ्या किती वस्तू पकडल्या, कितीचा मुद्देमाल जप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत हवाईमार्गाने आलेल्या ७१ लाख ९५ हजार ८९९ रुपयांच्या बेकायदेशीररीत्या वस्तू जप्त करण्यात आल्या. यात ‘ड्रोन’, विदेशी मद्य यांचा प्रामुख्याने समावेश होता.

दरम्यान, हवाईमार्गाने अनधिकृतपणे सोने आणण्याचादेखील प्रयत्न झाला. २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत ४ कोटी ९६ लाख ७२ हजार ९६० इतक्या किमतीचे सोने जप्त करण्यात आले होते.

कोरोनाकाळात कारवाई नाही

२०१९-२० या कालावधीत सर्वाधिक ६६ लाख ९८ हजार ६८३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर २०२०-२१ मध्ये ४ लाख ९७ हजार २१६ रुपयांचा माल जप्त झाला. २०२१-२२ मध्ये एकही कारवाई झालेली नाही. १० जानेवारी २०२० ला सर्वाधिक ३२ लाख ८७ हजार ८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

२०१५ मध्ये पकडले ३ किलो सोने

३० जून २०१५ या एकाच दिवशी सर्वाधिक ३००२ ग्रॅम सोन्याचा माल पकडण्यात आला होता. त्याची किंमत ७४ लाख ६१ हजार २१२ इतकी होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी २,७२३ ग्रॅम तर २३ मार्च २०१४ रोजी १,४८१.६९ सोन्याचा माल जप्त करण्यात आला.

वर्षनिहाय कारवाई

वर्षसीमाशुल्क

२०१५-२०१६-१,०४,६७,९८०

२०१६-२०१७-१,२३,६६,३५७

२०१७-२०१८-१,१३,०७,०४६

२०१८-२०१९-८३,८७,४५८

२०१९-२०२० -६६,९८,६८३

२०२०-२१-४,९७,२१६

२०२१-२२-०