शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाच्या पॅकिंगवर कोलेस्ट्रॉल फ्री लिहिता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:56 IST

खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे.

ठळक मुद्दे कंपन्यांवर होणार कारवाई : एफडीएची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे.एका नामांकित कंपनीच्या वनस्पती तेलाच्या चार ब्रॅण्डच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल असे लिहिले आहे. वर्धा येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने कंपनीच्या आपत्तीजनक जाहिरातीच्या विरोधात केस दाखल केली आहे. कंपनीला नोटीस जारी करून उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.हे प्रकरण नागपूर विभागाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणी आरोप सिद्ध झाले तर कंपनीवर प्रत्येक प्रकरणात १० लाखांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. अशाच प्रकरणात एफडीएने अन्य कंपनीला नोटीस जारी केली आहे. याशिवाय नागपूर विभागात खाद्यतेलाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या पॅकेजिंग लेबलची तपासणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा खोटा दावा करण्यात येणाऱ्या सर्व कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने म्हटले आहे.बाजारपेठेत विविध कंपन्यांचे विभिन्न प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत. अनेकांनी लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री, झिरो कोलेस्ट्रॉल अथवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा दावा करणारी जाहिरात केली आहे. तसे पाहता वनस्पती आधारित तेलात कोलेस्ट्रॉल नसतेच. प्राण्यावर आधारित उत्पादनात जसे डेअरी उत्पादने व मासांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे खाद्यतेलाच्या पॅकिंगवरील लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री उत्पादन असल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.एफडीएने नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाच्या जाहिरातीच्या विरोधात कलम २.४.२ (१) पॅकेजिंग आणि लेबलिंग नियमानुसार कारवाई केली आहे. कंपनीकडून समाधानकारक उत्तर अद्याप आलेले नाही. कंपन्यांनी असा चुकीचा दावा करू नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प