शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीची मृत्यूच्या दाढेतून सुटका

By admin | Updated: August 28, 2015 03:04 IST

सात वर्षीय चिमुकलीच्या डाव्या डोळ्यातून मेंदूपर्यंत खुपसलेली १२ सेंटिमीटरची सळाक काढण्यास गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले.

प्रमोद गिरी व चमूला यश : डोळ्यातून मेंदूत शिरलेली सळाख काढली बाहेर नागपूर : सात वर्षीय चिमुकलीच्या डाव्या डोळ्यातून मेंदूपर्यंत खुपसलेली १२ सेंटिमीटरची सळाक काढण्यास गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सलग दोन तास किचकट शस्त्रक्रिया करून तिची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका केली. बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर जवळच्या कोलमारा येथील रहिवासी असलेली चिमुकली वैशाली गाडेकर हिला डोळ्यात खुपसलेली सळाक, अशा अवस्थेत मेडिकलच्या नेत्रविभागात बुधवारी आणले. विभाग प्रमख डॉ. अशोक मदान यांनी तत्काळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्युरो सर्जरी विभागात तिला पाठविण्याची व्यवस्था केली. या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी वैशालीची सिटीस्कॅन व अ‍ॅन्जिओग्राफी करून गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. मानेवरच रक्तवाहिनीला ब्लॉक केले होतेडॉ. गिरी म्हणाले, या शस्त्रक्रियेत मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला इजा होऊ न देणे व मेंदूत रक्तस्राव होऊ नये हा उद्देश ठेऊन शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यासाठी आम्ही मानेवरच रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनेवर ताबा (ब्लॉक) घेतला होता. खुपसलेली सळाक गंजलेली व धारधार होती. ती काढण्यास जागा मिळावी म्हणून चेहऱ्याच्या मागच्या भागात जागा तयार करण्यात आली. त्या दोन गंभीर शस्त्रक्रियेचा अनुभव आलानागपूर : डॉ. गिरी म्हणाले, २०१२ मध्ये मेंदूत चाकू खुपसलेले दोन रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आले होते. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करून त्या दोघांचे प्राण वाचविले होते. त्या अनुभवाची या शस्त्रक्रियेच्या वेळी बरीच मदत झाली, असेही ते म्हणाले. ही यशस्वी शस्त्रक्रिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी, डॉ. डिव्हिक मित्तल, डॉ. विशाल भस्मे, भूलतज्ज्ञ डॉ. लुलू फातिमा वली, डॉ. अभय गाणार, परिचारिका व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी झाली.