शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

बोअरवेलच्या खड्ड्यात पडला चिमुकला

By admin | Updated: April 7, 2017 03:03 IST

बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या पावणदोन वर्षांच्या चिमुकल्याला कळमना पोलिसांनी अवघ्या ५५ मिनिटात सुखरूप बाहेर काढले.

प्रथमेश सुखरूप : ५५ मिनिटात काढले बाहेर नागपूर : बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या पावणदोन वर्षांच्या चिमुकल्याला कळमना पोलिसांनी अवघ्या ५५ मिनिटात सुखरूप बाहेर काढले. प्रथमेश दीपक गजभिये असे या चिमुकल्याचे नाव असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला डॉक्टरांनी आपल्या निगराणीत ठेवले आहे. कळमना भांडेवाडीतील एकतानगरात गजभिये परिवार राहतो. दीपक गजभिये खासगी वाहनचालक असून, प्रथमेशची आई गृहिणी आहे. त्यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी बोअरवेलचा खड्डा खोदण्यात आला. खड्डा करणाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठून त्याचे तोंड तसेच उघडे ठेवले. चिमुकला प्रथमेश घराजवळ खेळता खेळता गुरुवारी सायंकाळी बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. दरम्यान, बराच वेळेपासून प्रथमेश नजरेस न पडल्याने अस्वस्थ झालेल्या त्याच्या आईने त्याला आवाज देत इकडे तिकडे शोघ घेतला. आईचा आवाज ऐकू आल्याने प्र्रथमेशही रडू लागला.बोअरवेलच्या खड्ड्यातून रडणे ऐकू येत असल्यामुळे आईने मदतीसाठी आरडाओरड केली. अल्पावधीतच बोअरवेल शेजारी बघ्यांची तोबा गर्दी उसळली. दरम्यान, गर्दीतील एकाने नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ५.४५ वाजता कळमना पोलिसांना घटनेची माहिती कळवली. ती कळताच ठाणेदार सुनील बोंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच घटनास्थळी धाव घेतली. ... अन् सुरू झाले बचाव कार्यघटनास्थळी अंधार असूनही बघ्यांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हवा मिळणार नाही, परिणामी आतमधील चिमुकल्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी गर्दीतील लोकांना बाजूला सारले. शेजाऱ्यांकडून तातडीने वायर, लाईट आणि पंखे बोलवून आतमध्ये उजेड पडेल तसेच हवा जाईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर प्रथमेशच्या आईला खड्ड्याजवळ बसवून प्रथमेशने निरंतर बोलावे, अशी व्यवस्था केली. दरम्यानच्या वेळेत प्रथमेश ८ ते १० फूट अंतरावर अडकल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी बोलवून बोअरवेलला समांतर खड्डा केला. १० ते १२ फुटानंतर दोन्ही खड्ड्यांच्या मध्ये एक खिडकी करून प्रथमेशला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलीस बनले देवदूत पोलिसांनी बाहेर काढलेला आणि चिखलमातीने भरलेला प्रथमेश सुखरूप असल्याचे कळताच हजारोच्या गर्दीने आनंदाने एकच गलका केला. पोलिसांनी लगेच त्याला बाजूच्या डॉ. कुबडे यांच्या चाईल्ड केअर सेंटरमध्ये नेले. त्याला तपासल्यानंतर तो सुखरूप असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी नोंदविला. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला डॉक्टरांनी आपल्या निगराणीत ठेवून घेतले. प्रथमेशला सुखरूप बाहेर काढणारे कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे तसेच अरुण दामोदर भोयर, आशिष मोरेश्वरराव खानोरकर, अजय जयराजसिंग ठाकूर, विनोद नारायणराव कोल्हे, राजेंद्र भगवानजी वासाडे, सूर्यकांत सुभाषचंद्र तिवारी तसेच एस. आय. उईके हे देवदूत ठरले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रिन्सचा अनुभव कामी आलाअशा बचाव कार्याचे पोलिसांना कसलेही प्रशिक्षण नसते. मात्र, काही वर्षांपूर्वी प्रिन्स नामक बालक अशाच प्रकारे बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. त्यावेळी सैन्यदलाने बचावकार्य करून प्रिन्सला बाहेर काढले होते. वृत्तवाहिन्यांवरून हे सर्व आम्ही बघितले होते. तेच टीव्ही बघणे प्रथमेशला बाहेर काढण्यासाठी कामी आले, अशी प्रतिक्रिया यावेळी ठाणेदार बोंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.(प्रतिनिधी)