डान्स बारवर पोलिसांचा छापा : लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तबनागपूर : आॅर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारवर छापा घालून तेथे सुरू असलेला धांगडधिंगा पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी बंद पाडला. याप्रकरणी बारमालक आणि त्याच्या तीन कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली. बंदी असूनही नागपुरात बिनधास्त डान्स बार सुरू असल्याचे वृत्त २८ नोव्हेंबरला लोकमतने ठळकपणे प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे लोकमतच्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. डान्स बार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परवानाधारक डान्सबार मालकांनी तयारी चालविली आहे. त्याबाबत अद्याप निर्णय आला नाही. मात्र, उपराजधानी आणि आजूबाजूच्या भागातील काही बारमालक पोलिसांशी हातमिळवणी करून चोरी छुप्या मार्गाने डान्सबार चालवितात. मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पतियाळा, कोलकाता, लुधियाना, दिल्ली, रायपूर, इंदोर, लखनौसारख्या महानगरातील बहुचर्चित ‘बार डान्सर्स’ना बोलविले जाते. मध्यरात्री सुरू झालेली ही ‘डान्स नाईट’ पहाटेपर्यंत सुरू असते. या वेळेत नोटांचा अक्षरश: पाऊस पडतो. रविवारी अशाच प्रकारे सेंट्रल एव्हेन्यूवरील मदिरा बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांच्या निर्देशानुसार गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथे आॅर्केस्ट्राच्या नावाखाली मुंबई, पंजाबमधील बारबाला डान्स करीत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना, बारमालक नीरज गुप्ता, व्यवस्थापक श्रीकांत गायकवाड आणि दोन वेटर अशा सर्वांना ताब्यात घेतले.गणेशपेठचे ठाणेदार संजय खताळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)बार डान्सर मोकळ्यापोलिसांनी येथे रंगेहात पकडलेल्या तीन बारबालांमध्ये एक मुंबईची, दुसरी पंजाब तर तिसरी मूळची हैदराबादची असून, येथेच ती स्थायिक झाल्याचे समजते. बारमालक मोठ्या रकमेचे आमिष देऊन डान्स करवून घेत असल्याचे बयान या तिघींनी दिले. त्यावरून पोलिसांनी बारमालक गुप्ता, व्यवस्थापक गायकवाड आणि दोन वेटर्सना सोमवारी अटक केली. बारबालांना मात्र मोकळे केले. विशेष म्हणजे, या डान्सबारमध्ये मित्रांना बसवून एका व्यक्तीने डान्सबारची क्लिपिंग तयार केल्याची माहिती आहे. ही क्लिपिंगही आज व्हायरल झाली. अधिवेशनाची खास तयारीया कारवाईमुळे अशा छुप्या पद्धतीन डान्सबार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने खास तयारी केली होती आणि विविध महानगरातून अनेक बारबाला लाखो रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टवर नागपुरात बोलवून घेतल्याची माहिती आहे.
‘मदिरा’त छमछम
By admin | Updated: December 8, 2015 03:51 IST