शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहातील मुले उपाशी

By admin | Updated: May 14, 2017 02:15 IST

अनाथ, निराधार, पीडित, विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने बालगृहांची स्थापना केली.

१ मेपासून कंत्राटदारांनी केले रेशन बंद : दोन वर्षांपासून अनुदान ठप्प लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनाथ, निराधार, पीडित, विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने बालगृहांची स्थापना केली. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून ही बालगृहे संचालित करण्यात आली. परंतु निधीअभावी आज या बालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांचे २०१४ पासून बिल थकीत असल्याने त्यांनी १ मेपासून बालगृहांमध्ये रेशन पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे नागपुरातील चार, वर्धा येथील दोन बालगृहातील मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाटणकर चौकात शासकीय मुलांचे बालगृह कनिष्ठ, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व शासकीय मुलांचे वरिष्ठ अनुरक्षणगृह तसेच काटोल रोडवर शासकीय मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह आहे. सध्या काटोल रोडवरील बालगृहात ९४ मुली, निरीक्षणगृहात २७ मुले, वरिष्ठ अनुरक्षणगृहात १२ व कनिष्ठ बालगृहात ५१ मुले असल्याची माहिती आहे. १ मेपासून या मुलांना अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी पुरवठा बंद केला आहे. बालकांच्या संदर्भातील सर्व योजना एका छताखाली आणण्यासाठी केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत बालगृहांना जोडण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून प्रति मुलगा ७५० रुपये अनुदान देण्यात येते. या अनुदानात मुलांचे खाणे, कपडे, साहित्य, वीज बिल व इतर खर्च करावा लागतो. परंतु हे अनुदान अपुरे पडत आहे. आज या चारही बालगृहावर कंत्राटदारांचे करोडो रुपये थकीत आहे. मार्च महिन्यात अनुदान मिळेल असे आश्वासन स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्याने, कंत्राटदारांनी एप्रिलच्या शेवटपर्यंत दूध, फळ, अन्नधान्य, स्टेशनरी आदींचा पुरवठा केला. परंतु अनुदान न आल्याने १ मेपासून साहित्य पुरवठा बंद केला. कंत्राटदारांच्या करोडो रुपयांच्या थकीत बिलासंदर्भात जिल्हा बाल कल्याण अधिकाऱ्यांनी विभागाच्या उपायुक्तांना पत्र लिहिले. विभागाच्या उपायुक्तांकडून एकात्मिक बाल संरक्षण योजनेच्या आयुक्तांना व सचिवांना पत्राद्वारे वारंवार कळविण्यात आले आहे. परंतु मंत्रालयीन स्तरावरून निधीची कुठलीही तरतूद होत नसल्याने स्थानिक अधिकारी हतबल झाले आहे. मुलांची उपासमार होऊ नये म्हणून स्थानिक अधिकाऱ्यांनी अक्षयपात्र योजनेतून शुक्रवारपासून अन्न सुरू केले असल्याची माहिती आहे. परंतु कंत्राटदारांच्या करोडो रुपयांच्या बिलाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये असलेल्या बालगृहातसुद्धा हीच परिस्थिती आहे. तिथल्या मुलांचे काय, हा प्रश्न आहे.