शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बालगोपाळांनी घरीच साजरा केला तान्हा पोळ्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 20:26 IST

कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे नंदीची केली आकर्षक सजावटविदर्भाची खास परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीकामात उपयुक्त ठरणारा व शेतकऱ्यांच्या कृषी जीवनातील अविभाज्य भाग असलेला बैल मानवासाठी पुजनीय ठरला. म्हणून बैल पोळा मनोभावे साजरा केला जातो. त्याच मनोभावातून पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा होतो. हा खास बच्चेकंपनीचा आवडता सण. आपल्या आवडत्या नंदीला आकर्षकपणे सजवून लहान मुले मिरवत असतात. कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला.नागपूरकर राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी १८०६ मध्ये ही प्रथा सुरू केल्याचा इतिहास आहे. मुलांना बैलाच्या कष्टाचे मोल कळावे व त्यांना आनंद मिळावा हा त्यामागचा उद्देश. पुढच्या काळात हा उत्सव मुलांच्या कल्पकतेच्या सृजनाचे प्रतीक झाला आणि सुतार कारागिरांच्या रोजगाराचे माध्यम. हा एका दिवसाचा सण मात्र बच्चेकंपनी वर्षभर आठवण करीत असतात. मुलांनी हट्ट करायचा आणि पालकांनी त्यांच्यासाठी लाकडाचा नंदी आणायचा. मग मुले आपल्या नंदीला रंगरंगोटी करून व वेशभूषा घालून सजवितात. पुढे गावभर मिरवणूकही काढली जाते. लोक कौतुकाने मुलांना प्रोत्साहन आणि पैसेही (बोजारा) देतात. नागपूर शहरातील अनेक भागात विविध राजकीय, सामाजिक संघटनांकडून तान्हा पोळ्याच्या स्पर्धा व मिरवणुकांचे आयोजन केले जाते.

यावर्षी कोविडच्या प्रकोपामुळे सार्वजनिक स्पर्धा व मिरवणूक काढण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र आईवडिलांनी मुलांचा आनंद कमी होऊ दिला नाही. बहुतेक चौकात लाकडी बैलांची दुकाने लावण्यात आली आहेत. पालकांनी मुलांसाठी दोन दिवसांपासून नंदीची खरेदी केली. मुलांनीही त्या नंदीला आकर्षक पद्धतीने सजवून, वेशभूषा परिधान करून आनंद लुटला. त्या नंदीची पूजाही करण्यात आली. मिरवणुकीत जाता येत नसले तरी पालकांनी फोटो काढून सोशल मीडियावर मुलांच्या सृजनाचे प्रदर्शन केले.मिरवणूक नाही पण ऑनलाईन स्पर्धाशहरात वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये तान्हा पोळानिमित्त नंदी सजावट, फॅ न्सी ड्रेस स्पर्धा व मिरवणूक काढली जाते. तोरण बांधून सजविलेल्या नंदींसह मुले यात सहभागी होतात. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आणली आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्पर्धा व मिरवणुका काढण्यापासून संस्थांनी माघार घेतली आहे. मात्र काही संस्थांकडून ऑनलाईन सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जुना सुभेदार ले-आऊट भागात अमर शहीद विजय कापसे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी संस्थेने ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे. घरीच नंदी सजवून आकर्षक वेशभूषेत फोटो काढून संस्थेच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आकर्षक बक्षीसही ठेवले आहे.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक